स्मार्ट टेलिव्हिजन नसतानाही नेटफ्लिक्स वापरण्यासाठी या हँडी गाइडची होईल मदत

दिव्य मराठी

Apr 29,2019 10:58:00 AM IST

जरी तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही नसला तरी आता कोणत्याही स्ट्रीमिंग प्लेफॉर्म वरून वायरलेस कंटेंट मोठ्या स्क्रीनवर बघता येऊ शकतो. यासाठी गुगल क्रोमकास्ट एक परवडणारा पर्याय आहे. या पक-शेप (आईस हॉकी डिस्कचा आकार असलेल्या) डोंगलला टिव्हीशी एचडीएमआय पोर्टद्वारे जोडल्यास स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप सारख्या माध्यमातून त्याला नियंत्रित करता येऊ शकते. इथे उपलब्ध नेटफलिक्सवर मूळ आणि सिंडिकेटेड टेलिव्हिजन शोजची मोठी यादीच पाहायला मिळते. त्यातून तुम्हाला हवा ताे कंटेट पाहता येते. अशा पद्धतीने क्रोमकास्ट वापरण्यासाठी पुढील हँडी गाईडची मदत होऊ शकते..

किती असावे रिझाेल्यूशन
गुगल क्रोमकास्टच्या माध्यमातून तुम्ही नेटफ्लिक्स 1080 पी मध्ये सहज चालवू शकतात. पण 4के मध्ये ते स्ट्रीमिंग करण्यासाठी क्रोमकास्ट अल्ट्रा वापरावे लागेल, तसेच नेटफ्लिक्सचे प्रीमियम सबस्क्रिप्शन गरजेचे आहे. ज्यांना 4के स्ट्रीमिंगची गरज नाही त्यांच्यासाठी स्टॅण्डर्ड पॅकेज (फुल एचडी, 1080 पिक्सेल) किंवा स्वस्त पॅक देखील उपलब्ध आहे.

असा करता येईल सेटअप
क्रोमकास्ट डिव्हाईस टीव्ही आणि वायफायला कनेक्ट केल्यानंतर, लॅपटॉप किंवा स्मार्टफोनवर नेटफ्लिक्स अॅप ओपन करावे. आता तुम्हाला स्क्रीनच्या सर्वात वरील बाजूस किंवा सर्वात खाली उजव्या बाजूस कास्ट आयकॉन (वायफाय बार असलेला छोटा व्ही स्क्रीन) दिसेल. या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर उपलब्ध डिव्हाईसेसच्या लिस्टमध्ये क्रोमकास्ट सिलेक्ट केल्यावर नेटफ्लिक्स लॉन्च होईल.

सेटअप होत नसल्यास
नेटफ्लिक्स सेटअप हाेत नसल्यास अशा परिस्थितीत क्रोमकास्टच्या तुम्ही बदललेल्या नावामध्ये कोणतेही स्पेशल कॅरेक्टर ( जसे ईमोजी किंवा अपॉस्ट्रॉफी) नसावी, कारण यामुळे नेटफ्लिक्स अॅप असे स्पेशल कॅरेक्टर ओळखू शकत नाही. तुम्ही तुमच्या डिव्हाईस वर क्रोमकास्ट इन्स्टॉल करून नंतर त्याचे नाव बदलू शकता. याने ही सेटअप न हाेण्याची समस्या सुटली नाही तर नेटफ्लिक्सची ट्रबलशूट प्रोसेस फॉलो करा.

क्रोमकास्ट करणारे डिव्हाइस
नेटफ्लिक्स अॅप विनाशुल्क डाऊनलोड करता येते. ते आयफोन, आयपॅड आणि आयपॉड टच मॉडेल (आयओएस ७ च्या पुढच्या व्हर्जन) च्या डिव्हाईस वर उपलब्ध आहेत. अँड्रॉइड युजर्ससाठी अँड्रॉइड ४.१ किंवा त्याच्या पुढचे डिव्हाईस म्हणजे स्मार्टफोन किंवा टॅब्लेट असावे. अँड्रॉइडसाठी २.४ व्हर्जन आणि आयओएस साठी ४.२ किंवा हायर व्हर्जनवर नेटफ्लिक्स चालायला हवे.

X