आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • It Is Wrong To Make The Math Of Victory From The Crowd Gathering In Navapur Constituency

गर्दी वरून विजयाचे गणित लावणे चुकीचे, नाईक व गावित एकमेकांना प्रतिस्पर्धी मानत नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- नवापूर विधानसभा मतदार संघात गावित-नाईक-गावित या तीन मातब्बर परिवाराची राजकीय अस्तित्वासाठी खरी तिरंगी लढत आहे. रॅली व सभेमध्ये जमलेल्या गर्दीवरून विजयाचे गणित लावत असला, तर भ्रम निराशा होईल. नवापूर विधानसभा मतदार संघात ग्रामीण भागातील नागरिक तिन्ही उमेदवारांच्या रॅली व सभेत उपस्थिती लावत आहे. मोजके पक्षनिष्ठ कार्यकर्ते आपल्या नेत्यांची रॅली व सभा जोडून दुसऱ्याच्या रॅलीत व सभेत जात नाही. उर्वरित नागरिक अनेकांच्या सभेते व रॅलीत उपस्थित राहतात. त्यामुळे गर्दी वरून विजयाचे गणित लावणे चुकीचे ठरेल.
ज्या उमेदवारामध्ये नवापूर विधानसभा मतदार संघाचा विकास करण्याची क्षमता असेल तोच उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होईल. पुर्वी पक्षाच्या नावावर मतदान होत होते. 2009 च्या विधानसभेच्या निवडणुकी नंतर चित्र बदलेल दिसत आहे. आदिवासी ग्रामीण भागातील मतदारांना जागृती आली आहे. आता ते पक्षासोबत व्यक्ती पाहून मतदान करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 
नवापूर शहरातील शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहे. मात्र, हे तात्पुरते समाधान आहे. यापैकी किती लोक आपले मत यांच्या झोळीत टाकतील येणार काळ सांगेल. एक मात्र निश्चित की, विधानसभेच्या निवडणुकीत अॅपेरिक्षा, जीपगाडी, ट्रॅक्स, यांची चांदी होताना दिसत आहे. या वाहनात फिरणाऱ्या कार्यकर्त्याना देखील चांगला रोजगार मिळत आहे. नाईक व गावित एकमेकांना प्रतिस्पर्धी मानत नाही


माजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित(भाजप) व विद्यमान आमदार सुरूपसिग नाईक (काँग्रेस) यांचे पुत्र शिरीष नाईक एकमेकांना प्रतिस्पर्धी मानत नसून त्यांची लढत अपक्ष उमेदवार शरद गावित यांच्या सोबत असल्याचे बोलत आहेत. अती आत्मविश्वास आहे, का भ्रम, की खरी परिस्थिती हे येणारा काळच सांगेल. प्रचाराचा मीटर काटा त्रिकोणी आकारात फिरत आहे 


काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरिष नाईक, भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार भरत गावित, अपक्ष उमेदवार शरद गावितसह इतर अपक्ष उमेदवारांनी नवापूर मतदार संघातील वेगवेगळ्या भागात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सध्या तरी निवडणुकीत रस्सीखेच सुरू आहे. मीटर काट्याप्रमाणे, प्रचारात आघाडीचा काटा कधी काँग्रेसकडे कधी भाजपाकडे तर कधी अपक्ष उमेदवारकडे जात आहे. कोणाही एका उमेदवारांवर स्थिर नाहीये. अति उत्साही कार्यकर्ते आपलाच नेता विजयी होईल असा अंदाज व्यक्त करत आहे.