आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरक्षणाच्या नावे कायदा हाती घेणे चुकीचे; आरक्षण ते हिंदुत्वापर्यंत भागवतांनी मांडली मते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गोरक्षणाशी संबंधित लोकांना जमावाकडून होणाऱ्या हत्यांशी (मॉब लिंचिंग) जोडणे योग्य नाही. गोरक्षण व्हायलाच हवे, परंतु गायींचे रक्षण करण्याच्या नावावर कायदा हातात घेण्याला आमचा विरोध आहे, अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी भूमिका मांडली. गायींच्या तस्करांनी चालवलेल्या हिंसाचाराविरुद्ध कुणी आवाज काढत नाही, असेही ते म्हणाले. 


'भविष्यातील भारत' या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीनदिवसीय चर्चासत्रानंतर बुधवारी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना भागवत उत्तरे देत होते. लोकांनी चिठ्ठीच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली.


आंतरजातीय विवाहांचे समर्थन...
आंतरजातीय विवाहांचे समर्थन करताना भागवत म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनीच भारतात सर्वाधिक आंतरजातीय विवाह केले आहेत. जातिव्यवस्था दूर झालीच पाहिजे. रामायण, महाभारत अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत ते म्हणाले, आपल्या परंपरेनुसार नवे शैक्षणिक धोरण आखले पाहिजे. 


हिंदुत्व की हिंदुइझम...
हिंदुइझम हा वापरला जाणारा चुकीचा शब्द आहे. सत्याचा सातत्याने शोध हेच खरे हिंदुत्व आहे. हे हिंदुत्व म्हणून निरंतर चालणारी दीर्घ प्रक्रिया आहे. म्हणून हिंदुइझम असे म्हटले जाऊ नये. हिंदुत्व हेच सर्वांना सोबत घेऊन परस्परांचा आधार ठरू शकते, असे ते म्हणाले.


आरक्षणाला संघाचा पाठिंबा...
विषमता दूर करण्यासाठी घटनेने दिलेल्या आरक्षणाचे आम्ही समर्थन करतो. आरक्षण ही समस्या नाही, त्यावरून होणारे राजकारण ही मोठी समस्या असल्याचे भागवत म्हणाले.


अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग नको...
अॅट्रॉसिटी कायद्याच्या माध्यमातून उपेक्षित घटकांवरील अत्याचार दूर होण्यास मदत झाली ही चांगली गोष्ट आहे. मात्र, या कायद्याचा दुरुपयोग होत आहे. त्यामुळे हा कायदा व्यवस्थितपणे लागू केला जावा.

बातम्या आणखी आहेत...