आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटी क्षेत्रात पाच वर्षांत झाली ८.७३ लाख रोजगार निर्मिती : माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली । नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात आयटी क्षेत्रात ८.७३ लाख नवीन रोजगार निर्मिती झाली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी हा दावा केला. ते म्हणाले की, मी हा आकडा आयटी उद्योगातील सर्वात मोठी संघटना नॅसकॉमच्या आकड्यांच्या आधारावर दिला आहे. सध्या या क्षेत्रात प्रत्यक्ष स्वरूपात ४१.४० लाख लोकांना आणि अप्रत्यक्ष स्वरूपात १.२ कोटी लोकांना रोजगार मिळालेला आहे. काँग्रेस पक्ष रोजगाराची चुकीची आकडेवारी देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

 


त्यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत आर्थिक घडामोडी आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमध्ये तेजीने वाढ होत आहे. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. जर अर्थव्यवस्था ७.४ टक्क्यांच्या दराने वाढली, राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती सुरू असेल, भारताच्या अर्थव्यवस्थेला जगभराने मान्यता दिलेली असेल तर, देशात रोजगाराच्या संधी वाढत आहे, असाच त्याचा अर्थ होतो, असा दावाही प्रसाद यांनी या वेळी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...