आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंमलबजावणी अशक्य ते निकालच देऊ नयेत: सबरीमाला मंदिरावरून केरळात राजकारण तापले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नूर- सबरीमाला मंदिरात सर्वच वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी येथे शनिवारी विरोध केला. धार्मिक भावना लक्षात घेऊन ज्या निकालाची अंमलबजावणी शक्य नाही ते निकालच दिले जाऊ नयेत, असे मत त्यांनी मांडले.कोर्टाच्या निकालाविरुद्ध केरळमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान भक्तांना अटक करणाऱ्या केरळ सरकारवरही शहा यांनी हल्लाबोल केला. केरळचे डावे सरकार मंदिरे आणि हिंदू परंपरा नष्ट करण्याचे षड‌्यंत्र रचत असल्याचे ते म्हणाले. 


कन्नूरमध्ये भाजप कार्यालयाच्या उद््घाटनानंतर शहा बोलत होते. भाजप भगवान अय्यप्पांच्या भक्तांच्या पाठीशी संपूर्ण शक्तिनिशी उभा राहील, अशी हमी त्यांनी दिली. 
स्वामींच्या आश्रमावर हल्ला.


तिरुवनंतपुरम | सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश दिला जावा म्हणून समर्थन करणारे स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर शनिवारी काही लोकांनी हल्ला केला. पहाटे २ वा. या आश्रमाजवळ जाळपोळ करण्यात आली.

 

उद््घाटनापूर्वीच विमानतळावर उतरले
कन्नूर विमानतळाचे उद््घाटन अजून व्हावयाचे आहे. मात्र, अमित शहा या विमानतळावर लँडिंग करणारे पहिले प्रवासी ठरले. केरळ सरकारने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्लीतून फोन येताच केरळ सरकारने माघार घेतली.

बातम्या आणखी आहेत...