आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • It Will Be Coldest In North central India Till November 28, And The Minimum Temperature Will Be Minus 16 Degrees By January

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

28 नोव्हेंबरपर्यंत उत्तर-मध्य भारतात थंडी पसरेल, जानेवारीपर्यंत किमान तापमान 16 अंशांनी होईल कमी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या दोन महिन्यांत 8 ते 10 पश्चिमी विक्षोभ, प्रत्येक पश्चिम विक्षोभानंतर देशभरात पारा घसरेल
  • पठारी प्रदेशात मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर 13.4 अंशासह सर्वात थंड
  • मार्चपर्यंत थंडी टिकून राहणार, फेब्रुवारीपर्यंत कडाक्याची थंडी?

​​​​​​नवी दिल्ली : सध्या हिमालयाच्या भागांत २४ तास हिमवृष्टी सुरू असून उत्तर-पश्चिम दिशेकडून अतिशीत वारे वाहण्याची सिस्टीम सक्रीय झाल्याने पठारी प्रदेशांसह देशातील मध्य भागात पारा उतरू लागला आहे. पठारी प्रदेशाचा विचार करता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये सर्वात कमी १३.४ अंश तापमान नोंदले गेले. हवामान तज्ज्ञांनुसार, सोमवारी सकाळपर्यंत थंड वारे वाहत राहतील. २५-२६ रोजी नवा तसेच या महिन्यातील पाचवा पश्चिमी विक्षोभ तयार होत असल्याने पर्वतीय प्रदेशांत हिमवृष्टी सुरू होईल. अशा स्थितीत २८ नोव्हेंबरपर्यंत पंजाब, हरियाणा, दिल्ली, संपूर्ण उत्तर प्रदेश, राजस्थान व मध्य प्रदेशातील सर्व भाग थंडीने व्यापेल. देशात २०१९-२० प्रमाणेच मार्चपर्यंत थंडी कायम राहील. फेब्रुवारीपर्यंत कडाक्याची थंडी राहणार असून मार्चमध्ये हिवाळ्यासारखा अनुभव असेल.

काश्मीरमध्ये १२९% व हिमाचलमध्ये ९% अधिक हिमवृष्टी
 
चोवीस तासांत काश्मीरच्या बनिहालमध्ये ३४ मिमी, गुलमर्गमध्ये १८, काजीगुंडमध्ये २६ व मनालीमध्ये ३० मिमी हिमवृष्टी झाली. १ नोव्हेंबरपासून आजपर्यंत काश्मीरमध्ये सरासरी १२९% व हिमाचलमध्ये ९% अधिक हिमवृष्टी, पाऊस झाला आहे.

भास्कर एक्सपर्ट सांगताहेत या वेळी देशात थंडी कशी असणार आहे?

पूर्व भारत-पश्चिम मध्य प्रदेशात कडाक्याची थंडी, दोन-तीन हप्त्यांत थंडीचे नवे विक्रम घडतील


जपानची राष्ट्रीय हवामान संस्था अॅप्लिकेशन लॅबोरेटरी ऑफ जेम्सटेकच्या मते हिंदी महासागरात मजबूत डायपोल व प्रशांतमध्ये अलनिनो शांत राहिल्याने या वेळी पावसाळा खूप काळ टिकला. याचा परिणाम थंडीवर होणार आहे. या वर्षी भारतात पश्चिम मध्य प्रदेश व पूर्व भारत सोडून इतर भागात थंडी साधारण असेल. पश्चिम मध्य प्रदेश व पूर्व भारतात अपेक्षेपेक्षा जास्त थंडी पडणार आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे की डिसेंबर महिन्यात उत्तर पश्चिम, मध्य भारत व उत्तरपूर्व राज्यांत सरासरी तापमान एक ते तीन अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल. अशा प्रकारे २०१९-२० च्या हिवाळ्यात हे सरासरीपेक्षा अधिक तापमान असलेले सलग ५ वे वर्ष असेल. हिवाळ्यातील काही हप्त्यात किमान तापमानाचे नवे विक्रम घडतील. मात्र, थंडी साधारण असेल.

स्कायमॅटच्या महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्यात हिमालयातील दक्षिण भागात पश्चिमी विक्षोभची संख्या वाढते. ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक महिन्यात ४ ते ५ पश्चिमी विक्षोभ येतात. यामुळे दरवर्षी डोंगरावर बर्फवृष्टी व मैदानात पाऊस व थंडी वाढते. याचे प्रमाण कमी झाल्यानंतर उत्तर पश्चिमी दिशेने थंडीची लाट येते. यामुळे मैदानातील तापमान कमी होते. पुढील दोन महिने असे ८ ते दहा विक्षोभ तयार होतील.
 

बातम्या आणखी आहेत...