Home | International | Other Country | italy 20 thousand santa rally landed on funding for children39s hospitals and poor 18km rally from cycle and scooter

इटलीत मुलांचे रुग्णालय व गरिबांच्या मदतनिधीसाठी २० हजार सांता रस्त्यावर, १८ किमी दुचाकीवरुन रॅली

वृत्तसंस्था | Update - Dec 06, 2018, 11:25 AM IST

१२ ते ८५ वयोगटातील सांतांचा रॅलीत सहभाग

 • italy 20 thousand santa rally landed on funding for children39s hospitals and poor 18km rally from cycle and scooter

  रोम - ख्रिसमसच्या २१ दिवस आधी इटलीतील ट्यूरिनमध्ये २० हजार सांताक्लॉजनी १८ किमी अंतराची रॅली काढली. त्यानंतर ते एकत्र आले. या चॅरिटी कार्यक्रमाद्वारे त्यांनी मुलांचे रुग्णालय, गरीब व अनाथ लोकांसाठी मदतनिधी गोळा करत आहेत. या मदतनिधीतून या वर्गास ख्रिसमसची भेटवस्तू व इतर आवश्यक सामग्री देण्यात येणार आहे. या रॅलीत १२ ते ८५ वर्षे वयोगटातील सांताक्लॉज सहभागी झाले होते. यात महिलांचाही समावेश होता. सर्वांनी सायकल, स्कूटर व पायी चालत लोकांना मदतनिधी देण्याचे आवाहन केले. इटालियन चॅरिटी इव्हेंटचे हे ९ वे वर्ष होते. या कार्यक्रमात २० हजारांहून अधिक सांताक्लॉज गोळा झाले होते.

  डान्स व गाणे गात जमवला निधी
  निधी जमा करण्यासाठी सांतानी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या. रॅलीत काही सांतानी छोट्या पपीजना कुशीत घेतलेले होते. काहींनी लोकांचे लक्ष वेधण्यासाठी बँडसोबत गाणी गायली. तर मुलांची सांता टीम लोकांचे लक्ष वेधून घेत होती.

  अनाथांची मदत करण्याचा सण
  ट्यूरिनच्या महापौर शियारा अॅपेंडिनो हिने म्हटले, ख्रिसमस जगातील सर्वात मोठा सण आहे. हा गरीब व अनाथ लोकांना मदत करणे, त्यांची समस्या जाणून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. यामुळेच आम्ह लोकांसाठी निधी गोळा करत आहोत. त्यांना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू या.

Trending