Home | International | Other Country | Italy: Chengrachanger in the nightclub; 6 killed, 120 injured

इटलीत कॉरिनाल्डो शहरात नाइट क्लबमध्ये चेंगराचेंगरी; 6 ठार, 120 जखमी

वृत्तसंस्था | Update - Dec 09, 2018, 08:58 AM IST

एका हल्लेखोराने नाइट क्लबमध्ये आलेल्यांवर मिरची पूड असलेले स्प्रे फवारले

  • Italy: Chengrachanger in the nightclub; 6 killed, 120 injured

    रोम- इटलीतील नाइट क्लबमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ६ जणांचा मृत्यू झाला, तर डझनावर लोक जखमी झाले. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास कॉरिनाल्डो शहरातील नाइट क्लबच्या परिसरात रॅप कॉन्सर्टदरम्यान घडली. हे शहर मध्य इटलीत आहे.

    एका हल्लेखोराने नाइट क्लबमध्ये आलेल्यांवर मिरची पूड असलेले स्प्रे फवारले. त्यानंतर ही घटना घडल्याचा दावा प्रसार माध्यमांतून करण्यात आला आहे. स्प्रेमुळे तरुणांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यांनी पळायला सुरुवात केली. कॉन्सर्टच्या निमित्ताने शेकडो लोक एकत्र आलेले होते. शनिवारी पहाटे एकच्या सुमारास ही घटना घडली. मैदानाला बाहेर जाण्याचे तीन मार्ग होते. गोंधळ उडाल्यानंतर लोकांचा लोंढा याच दरवाजाकडे आला होता. तेथे एक लहान पूल आणि कार पार्किंगची जागाही होती. मृतांमध्ये पाच जण १८ वर्षांहून कमी वयाचे होते. त्यात तीन मुली, दोन मुलांचा व एका महिलेचा समावेश आहे.

Trending