आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीत Bridge चा 200 मीटर भाग कोसळला; रेलवे ट्रॅकसह रस्ते, घरांवर पडला ढिगारा, 10 जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोम - इटलीतील जेनोआ शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे ब्रिजचा 200 मीटर भाग कोसळला आहे. भारतीय समयानुसार, दुपारी अडीचच्या सुमारास पडलेल्या या ब्रिजचा ढिगारा रस्ते, घरे आणि रेल्वे ट्रॅकवर पडला. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरीही प्राथमिक माहितीनुसार, किमान 10 जणांचा मृत्यू झाला असे सांगितले जात आहे. ब्रिज कोसळताना त्याखाली 10 वाहने दबली आहेत. त्यामुळे, बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहेत. इटली सरकारने या घटनेवर शोक व्यक्त केला. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हे ब्रिज 1960 मध्ये बांधण्यात आले होते. 2016 मध्ये त्याची डागडुजी करण्यात आली होती.

 

बातम्या आणखी आहेत...