Home | International | Other Country | Italy nightclub stampede kills at least six, injures over hundred

इटलीच्या नाइटक्लबमध्ये चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; 100 हून अधिक जण जखमी, 10 अत्यवस्थ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 11:03 AM IST

दुर्घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी जवळपास 1000 लोक उपस्थित होते.

  • Italy nightclub stampede kills at least six, injures over hundred

    रोम - इटलीत अँकोना शहरातील एका नाइटक्लमध्ये शनिवारी रात्री उशीरा चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत किमान 6 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी आहेत. जखमींपैकी 10 जण अत्यवस्थ आहेत. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पार्टी सुरू असताना काही लोकांवर ब्लॅक पेपर स्प्रे मारण्यात आला. यानंतर भीतीने लोकांनी पळापळ सुरू केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, लँतेर्ना अॅझुरा या क्लबमध्ये एका प्रसिद्ध डीजेचा शो सुरू होता. दुर्घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी जवळपास 1000 लोक उपस्थित होते.

    - सर्वच जखमींना तातडीने उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांचे हात किंवा पाय मोडले आहेत. तर 10 जण अत्यवस्थ असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाने ट्विटरवर यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ जारी केले आहेत.
    - स्फेरा एबास्ता नावाने प्रसिद्ध असलेला 26 वर्षीय रॉकस्टार जियोनाता बोशेती इटलीतील सर्वात प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. लँतेर्ना अॅझुरा क्लबमध्ये त्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे, जवळपास 1000 लोकांनी क्लबमध्ये गर्दी केली होती. इटलीच्या स्थानिक वेळेनुसार, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्रीनंतर 1 वाजता ही दुर्घटना घडली आहे.

    गतवर्षी जून महिन्यात ट्युरिन शहरात अशाच एका नाइटक्लबमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. फटाक्यांमुळे घडलेल्या त्या दुर्गटनेत जवळपास 1500 जण जखमी झाल्याची नोंद आहे. त्यावेळी चॅम्पियन्स लीगचे फायनल मॅच सुरू होते. चेंगराचेंगरीसाठी आतषबाजीला दोष देण्यात आले होते.

Trending