दांपत्याला प्रत्येक मुलामागे / दांपत्याला प्रत्येक मुलामागे 2 लाख, 80 रुपयांमध्ये घर; लोकसंख्यावाढीसाठी इटलीत परदेशींसाठी अनोख्या ऑफर

Feb 01,2019 07:28:00 AM IST

रोम- एकीकडे लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न होत असताना इटलीतील अल्पाइन गावात वास्तव्य करण्यासाठी येणाऱ्या परदेशी दांपत्यांना प्रत्येक मुलामागे दोन लाख रुपये दिले जाणार असल्याची घोषणा तेथील नगराध्यक्षांनी केली. मागील १० वर्षांत इटलीतील जन्मदरात विक्रमी २.५% घसरण झाल्यानंतर परदेशी नागरिकांना गावात वसवण्यासाठी अनेक गावांनी मोहीम सुरू केली आहे. यासाठी अनेक ऑफर दिल्या जात आहेत. एका वस्तीने तर परदेशी नागरिकांना वास्तव्यासाठी सव्वासात लाख रुपये देण्याचे प्रलोभन दिले. शिवाय शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोफत असणार आहे. ओल्लोलाई गावाने तर वास्तव्यासाठी केवळ ८० रुपयांत घर भाड्याने देण्याची ऑफर दिली. पीडमाँटमधील लोकांना या एका छोट्याशा गावात राहण्यासाठी आल्यास तीन वर्षांपर्यंत सव्वासात लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणा तेथील नगराध्यक्ष जिओवानी ब्रुनो यांनी केली. जर एखाद्या दांपत्याला एक अपत्य असल्यास त्यांना वार्षिक ५ लाख रुपये देण्यात येतील. लोकाना हे गाव फ्रान्स व स्वित्झर्लंडच्या सीमेवर वसले आहे. ब्रुनो यांच्या मते, गावची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. सन १९०० मध्ये येथे ७ हजार लोक राहत होते. १५०० लोक कामानिमित्त बाहेर गेले. मुलांची संख्या कमी झाल्याने शाळा बंद पडणार होती. प्रत्येक वर्षी ४० लोकांचा मृत्यू होत होता, तर केवळ १० मुलांचा जन्म झाला. ३० वर्षांपासून इटलीतील गावांत अशीच स्थिती आहे. १३९ गावांमध्ये १५० पेक्षा कमी मुले राहिली आहेत. या ठिकाणी शाळा, महाविद्यालये बंद पडल्याचे ते म्हणाले.

युवक, मुलांची गरज
इटलीतील बॉर्गोमेजवेल गावातील नगराध्यक्ष अलबर्टो प्रियोनी म्हणाले की, 'आम्हाला मुले आणि युवकांची गरज आहे. येथे जन्मणाऱ्या मुलांना ७१ हजार आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी १.६२ लाख रुपये दिले जातील. शिवाय करही लागणार नाही.

X