आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथच्या खडतर मार्गावर आयटीबीपीची ढाल, दरड काेसळण्याच्या घटनांपासून अनेकांचा बचाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरनाथ यात्रेतून -  श्री अमरनाथ यात्रेसाठी बाबा बर्फानीचे दर्शन करण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. यात्रा सुरू झाल्यापासून ४४ हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची नाेंद मंदिर व्यवस्थापनाकडे आहे. जम्मू येथून दरराेज भाविकांचे जथ्थे साेडले जात आहेत. संपूर्ण यात्रेला आयटीबीपीने (इंडाे-तिबेट बाॅर्डर पाेलिस) सुरक्षा प्रदान केली आहे. अमरनाथ मार्गावर माेठ्या प्रमाणावर हिमस्खलनाच्या घटना हाेत असून भाविकांना हिमस्खलनाच्या तडाख्यातून राेखण्यासाठी आयटीबीचे जवान हातात फायबर पॅनल घेऊन जणू भाविकांची ढाल बनून उभे आहेत.


वातावरणातील वाढत्या तापमानामुळे हिमालयातील बर्फ झपाट्याने वितळत असून याचा परिणाम बाबा अमरनाथाच्या बर्फाच्या शिवलिंगावर हाेत आहे. यात्रेचा मार्ग अत्यंत खडतर आहे. अमरनाथ यात्रा मार्गावर हृदयक्रिया बंद पडणे, श्वासाेच्छ॰वास अडथळा, घाेड्याचे पाय घसरून पडल्याने सहा भाविकांचे निधन झाले. बालटाल मार्गावरून प्रत्येक चार किमी अंतरावर आयटीबीपीने क्लिनिक उभारले असून तेथे आॅक्सिजनची व्यवस्था करून देण्यात आली आहे. डाेंगर असलेल्या बाजूने भाविकांना चढण्याच्या सूचना दिल्या जातात. प्रत्येक पन्नास मीटरवर आयटीबीपीचे दाेन ते तीन जवान हातात एके-४७ रायफल घेऊन चाेख बंदाेबस्त करतात. सकाळी ४.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत खडा पहारा असताे. 


या भागात माेठ्या प्रमाणात बर्फ जमा झालेले आहे. तापमान वाढीमुळे हिमनदी वितळत आहे. 
बर्फाचे कडे वितळू लागल्याने दरडी ढासळू लागल्या आहेत. अशा स्थितीत ध्वनिक्षेपकाने भाविकांना मार्ग सुकर करण्याची घाेषणा सातत्याने केली जाते. त्यांच्या मदतीला एनडीआरएफचे जवानही माेठ्या प्रमाणावर आयटीबीपीच्या जवानांना साहाय्य करताना दिसतात. 


मार्गावर भंडारे, निवास व्यवस्थाही 
पायऱ्या चढताना आॅक्सिजनची अनेक भाविकांना गरज पडते. पायऱ्यांच्या मधाेमध आॅक्सिजनची व्यवस्था केली आहे. तीन किमी परिसरात साचलेल्या बर्फावरच भाविकांना थांबण्याची व्यवस्था आहे. अनेक ठिकाणी माेफत भंडारेही आहेत. गरम पाण्याची व्यवस्था आहे. येथे आयटीबीपी, बीएसएफ, सीआरपीएफ, आठ राजपुताना रेजिमेंट आदींच्या तुकड्या गुहेजवळ तैनात आहेत. यात्रामार्गावर मात्र आयटीबीपीचाच बाेलबाला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...