आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीडित मुलगी शिकलेली असेल तर आरोपीस ‘पॉक्सो’त शिक्षा देणे सोपे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर-अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी ‘पॉक्सो’सारखा कडक कायदा तयार करण्यात आला आहे. पण या प्रकरणातील पीडित अल्पवयीन आहे हे सिद्ध झाल्यावरच हा कायदा उपयुक्त ठरतो. त्यामुळे पॉक्सोच्या प्रत्येक प्रकरणात आरोपींचा पूर्ण भर पीडिता ही सज्ञान सिद्ध करण्यावरच राहतो. ‘दिव्य मराठी’ने पॉक्सोच्या २० प्रकरणांची पडताळणी केली तेव्हा असे आढळले की, ज्या पीडित मुली शिक्षित आहेत आणि त्यांच्याजवळ त्याचे रेकॉर्ड आहे, त्या स्वत:ला अल्पवयीन सिद्ध करण्यात यशस्वी झाल्या आहेत.


आम्ही पॉक्सोच्या गेल्या दोन महिन्यांत झालेल्या २० निकालांचा अभ्यास केला आहे. कायदेशीरदृष्ट्या सज्ञान सिद्ध करण्यासाठी सर्वात आधी इयत्ता १० वीची गुणपत्रिका पाहिली जाते. ती नसली तर इयत्ता पहिलीच्या प्रवेशाचे रेकॉर्ड असावे. नंतर नगरपालिका-परिषद व पंचायतीचे जन्म रजिस्टर तपासले जाते. यापैकी काहीही नसेल तर अखेर वैद्यकीय तपासणी होते. पण त्यात जे वय दाखवले जाते त्यात असे ओपिनियन दिले जाते की, दोन वर्षे कमी-जास्त होऊ शकते. अशा स्थितीत आरोपीला संशयाचा फायदा मिळतो. गुरुकुलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात आसारामला जन्मठेप झाली आहे.  पीडिता शिकलेली असल्यानेच हे शक्य झाले.

 

नोंदणी नसल्याने पॉक्सो लागू शकला नाही
जैसलमेरच्या फलसुंडमध्ये एका झाडलोट करणाऱ्याने मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. पॉक्सोनुसार गुन्हा दाखल झाला. त्याच्या बाजूच्या लोकांनी पंचायत भरवून चुकीसाठी त्याला माफी मागायला लावली. तसेच पीडितेवर जबाब बदलण्यासाठी दबाव टाकला. पीडिता इयत्ता ८ वीत शिकत होती, त्यामुळे १० वीची मार्कशीट नव्हती. इयत्ता ८ वीतील प्रवेशाच्या जन्मतारखेनुसार ती अल्पवयीन होती, पण इयत्ता पहिलीच्या प्रवेशाचे रेकॉर्डच नव्हते. कारण येथे तर ७ वी पास करून प्रवेश झाला होता. मागचे रेकॉर्ड कुठेच मिळाले नाही. आई-वडिलांनीही सांगितले की, जन्माच्या वेळी त्यांनी पालिका-पंचायतीत जन्माची नोंदही केली नव्हती. अखेर आरोपीला संशयाचा फायदा मिळाला आणि तो पॉक्सोच्या गुन्ह्यातून दोषमुक्त झाला.

 

१० वीची गुणपत्रिका होती, त्यामुळे सज्ञान मानले
जोधपूरच्या जवळ कुडी भगतासनी येथून एका मुलाचे अपहरण झाले. तिला महाराष्ट्रातील रत्नागिरीत डांबून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. एकाच समाजाचे प्रकरण असल्याने सामाजिक दबावामुळे पीडितेने जबाब बदलला आणि मी माझ्या मर्जीने लग्न करण्यासाठी गेले होते, असे सांगितले. पण पीडिता इयत्ता ११ वीत शिकत होती. त्यामुळे १० वीच्या गुणपत्रिकेत तिचे वय ६ ऑगस्ट १९९७ असे लिहिलेले होते. या हिशेबाने घटनेच्या वेळी ती अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाले. अल्पवयीन असल्याने आरोपीला शिक्षा झाली आणि वरच्या न्यायालयातही तिचे अपील रद्द झाले.

बातम्या आणखी आहेत...