आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड बँकेच्या प्रमुखपदाच्या शर्यतीत ट्रम्प कन्या इव्हांका; यूएनच्या माजी राजदूत निकी हॅली यांना आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हांका जागतिक बँकेच्या प्रमुख पद मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सद्यस्थितीला आपले वडील आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या त्या सल्लागार आहेत. प्रसिद्ध दैनिक द फानान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, त्या वर्ल्ड बँकेच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. जागतिक बँकेचे मावळते प्रमुख जिम योंग किम यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा वारसदार शोधला जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, याच पदासाठी अमेरिकेच्या यूएनमध्ये माजी राजदूत असलेल्या निकी हॅली सुद्धा इच्छुक आहेत. अशात इव्हांका यांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.


जागतिक बँकेचे प्रमुख किम यांनी याच आठवड्याच्या सुरुवातीला आपला राजीनामा जाहीर केला. कार्यकाळ पूर्ण होण्यापर्यंत आपण या पदाची जबाबदारी सांभाळण्यात असमर्थ आहोत असे ते म्हणाले होते. सलग दोनवेळा वर्ल्ड बँक प्रसिडेंट ठरलेले किम यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार होता. परंतु, त्यांनी स्वतःच पायउतार होण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे निकी हॅली यांनी गेल्या महिन्यातच अमेरिकेच्या यूएनमध्ये राजदूत पदाचा राजीनामा दिला. त्या आता वर्ल्ड बँकेचे प्रमुखपद मिळवण्याच्या तयारी आहेत. यादीत असलेल्या इतर नावांमध्ये आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरील कोषागार विभागाचे उप-प्रमुख डेविड मॅलपास आणि अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास समितीचे अध्यक्ष मार्क ग्रीन यांचाही समावेश आहे.


इव्हांका ट्रम्प 2017 मध्ये महिलांसाठी गोळा केलेल्या निधीवरून चर्चेत आल्या होत्या. त्यांनी सौदी अरेबियाच्या महिला समर्थक योजनेकरिता वर्ल्ड बँकेला 1 अब्ज अमेरिकन डॉलर निधी गोळा करून देण्यासाठी मदत केली होती. परंतु, अमेरिकेच्या कोषागार विभागाने इव्हांका किंवा इतर कुणाच्या उमेदवारीवर अधिकृत प्रतिक्रिया जारी केलेली नाही. कोषागार विभागाकडे या पदासाठी अनेक जणांचे अर्ज येत आहेत. त्याची छानणी केल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जारी केली जाईल असे या विभागाने स्पष्ट केले. जागतिक बँकेत अमेरिकेचा सर्वात मोठा वाटा आहे. आतापर्यंतच्या अध्यक्षपदांसाठी अमेरिकेनेच नावे सूचवण्याचे संकेत आहेत. तरीही अमेरिकेचाच उमेदवार निवडला जाईल हे स्पष्ट नसते. दरम्यान, वर्ल्ड बँकेने यापूर्वी जारी केलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. यानंतर एप्रिलमध्ये अध्यक्षाच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...