आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुडापेस्ट - युराेपीय देश हंगेरीच्या सरकारने देशाची लाेकसंख्या वाढवण्यासाठी माेठी घाेषणा केली आहे. पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी गुरुवारी फर्टिलिटी पाॅलिसीचे धाेरण जाहीर केले. त्यात देशभरातील सर्व कुटुंबाला वंध्यत्व निवारणाच्या सुविधा माेफत दिल्या जाणार आहेत. त्याशिवाय ४ मुलांच्या मातांना जीवनभर उत्पन्नावर करमुक्तीची सवलत देण्याचे जाहीर केले. तरुण दांपत्यांना अनुदान, व्याजमुक्त कर्ज इत्यादी सारख्या याेजनाही जाहीर करण्यात आल्या. युराेपीय देशांत सर्वात कमी फर्टिलिटी रेट हंगेरीत आहे. त्यामुळे सरकारने लाेकसंख्या वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा व सवलती जाहीर केल्या. पंतप्रधान आॅर्बन म्हणाले, फर्टिलिटी हा रणनीतीच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा विषय आहे. सरकारने डिसेंबरमध्ये सहा फर्टिलिटी क्लिनिक सुरू केले. आॅर्बन २०१० पासून हंगेरीचे पंतप्रधान आहेत. ते स्थलांतराच्या तीव्र विराेधात आहेत. आपल्याला बाहेरून नकाे. केवळ हंगेरियन मुले हवी आहेत. युराेपने लाेकसंख्या वाढवली नाहीतर बाहेरील लाेक येथे येऊन त्यांची जागा पटकावतील.
७ कलमी कार्यक्रम जारी
४ मुलांच्या मातांना जीवनभर करमुक्त अशी सवलत देण्यात आली आहे. ७ आसनी वाहन खरेदीसाठी मदत होईल. ३ मुलांच्या जन्मापर्यंत २२ लाखापर्यंत कर्ज. घरासाठी अनुदान. २१ हजार नर्सरीज. आराेग्यासाठी वार्षिक १.५० लाख काेटी रुपये, करात सवलत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.