आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोश व भ्रमात स्वत:चा विसर पडू देऊ नका!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही जे करण्याची इच्छा आहे ते करा. त्यासाठी यशस्वी लोकांच्या पावलावर पाऊल टाका. अपयश येईल, पण त्यातून शिकायलाही मिळेल. तुम्ही बेस्ट परफॉर्म केले आहे, हे तुम्हाला तरी माहीत असेल. तुम्हाला जसे हवे होते, तसे आज झाले नसले तरी उद्यासाठी नव्या संधीचा शोध घ्या. विजेता नेहमीच काहीतरी निवडत असतो. या बाबी लक्षात घ्या आणि त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न करा...
विश्वासाच्या बाबींना विसरत नाही- प्रकाशकाचे न ऐकता जे.के. रोलिंगने हात वर केले असते तर हॅरी पॉटर मिळालाच नसता. 300हून अधिक वेळा गुंतवणूकदारांचे न ऐकता वॉल्ट डिस्नेने थीम पार्कची अपेक्षाच सोडून दिली असती तर डिस्ने अस्तित्वातच आले नसते. याचा अर्थ तुम्ही तुमची स्वप्ने सोडून दिली तर ती प्रत्यक्षात उतरलेली कधीही पाहायला मिळणार नाहीत.
दु:खाला जवळ करता- तुम्ही काही वस्तू, जागा आणि गोष्टींना कायम भीत असता. कारण त्यापासून तुम्हाला दु:ख होऊ शकते, परंतु लक्षात ठेवा दु:ख नेहमीच वाईट असत नाही. अनेकदा दु:खही यशाच्या दिशेने टाकलेल्या पावलाप्रमाणे असते.
नकारात्मक स्थितीत स्वत:चे भान ठेवता- दोन गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. एक- ज्या गोष्टींमुळे काहीही फरक पडत नाही. दोन- तुमचे असणे आणि नसणे सारखेच आहे, असा विचार करणारे लोक. संभ्रम, जोश आणि नकारात्मकतेमध्ये स्वत:चा विसर पडू देऊ नका. स्वप्नांची आठवण ठेवा. ती सोबत घेऊनच पुढे निघा.
सकारात्मक बदल आणता - व्यक्तीचे चारित्र्य हीच त्याची संपत्ती समजा. त्यामुळे कित्येक श्रीमंतांची पाटी कोरीच असल्याचे तुमच्या लक्षात येईल. पैसा असल्याने फरक पडत नाही. बदल घडवून आणा. यशस्वी लोकांना सकारात्मक फरकाची संकल्पना चांगली माहीत असते, तिचाच ते अवलंब करत असतात.
कृती करायला विलंब लावत नाही - तुम्ही उद्यावर लोटले नाही तर सर्वच महत्त्वाच्या गोष्टी एकाच दिवसात होऊ शकतात. चांगल्या जीवनासाठी आजच बीजारोपण करा. तुम्ही आज जे पेराल, उद्या तेच तुम्हाला मिळेल. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका.