आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शाह यांच्यानंतर जे.पी. नड्डा होऊ शकतात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, शाह यांना मिळू शकते मंत्री पद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भाजप अध्यक्ष अमित शाह यांना मोदी सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे खात्रीशीर सुत्रांकडून कळाले आहे. न्यूज एजंसी आयएएनएसनुसार, आता पक्ष अध्यक्षाचे पद आरोग्य मंत्री मंत्री जे.पी. नड्डा यांना दिले जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीत नड्डा यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आले होती. ही जबाबदारी योग्य रितीने पार पाडत त्यांनी यूपीत 80 पैकी 62 जागा मिळून दिल्या. अमित शाह यांनी 2014 मध्ये यूपीत 71 जागा मिळून दिल्या होत्या. 


2014 मध्ये अमित शाह यांना मिळाली होती यूपीची जबाबदारी
2014 लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांना भाजपने उत्तरप्रदेशचा प्रभारी बनवले होते. त्यावेळी राजनाथ सिंह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण, सरकार आल्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले त्यामुळे त्यांना भाजप अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर अमित शाह यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले.


पक्षात उत्कृष्ट रणनितीकार अशी अहे नड्डा यांची ओळख
न्यूज एजंसीने सांगितल्यानुसार, मोदी सरकार 10 जुलैला केंद्रीय बजेट सादर करणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. अशातच नड्डा पुठील राजकीय रणनिती आखू शकतात. अशी शंका आहे की, जम्मू-कश्मीर आणि कर्नाटकमध्ये गठबंधन सरकार धोक्यात दिसत आहे, त्यामुळे तिथे परत निवडणूका होण्याचे चिन्ह आहेत. त्यासोबतच पुढील वर्षाच्या सुरुवातील दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणूका आहेत.


दक्षिण भारतावर फोकस करतील नड्डा
पटनामधून बी.ए.चे शिक्षण घेतल्यानंतर नड्डा यांनी हिमाचलमधून एल.एल.बी. केले. त्यानंतर ते हिमाचलमधून 3 वेळेस आमदार म्हणून निवडणूक आले. 2014 मध्ये त्यांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले. नड्डा यांचा मुख्य फोकस दक्षिणच्या राज्यांवर असेल. ते या राज्यात भाजपला मोठा पांठिंबा मिळवण्याकडे लक्ष देतील. सध्या तेलंगानामध्ये भाजपने 4 आणि कर्नाटकमध्ये 23 जागेवर विजय मिळवला आहे.

बातम्या आणखी आहेत...