आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबलपूर येथील रुग्णालयात रुग्णाची हेळसांड, स्ट्रेचर न मिळाल्यामुळे वॉर्डब्वॉयने एक्स-रे काढण्यासाठी रुग्णाला फरशीवरून फरफटत नेले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबलपूर - येथील नेताजी सुभाषचंद्र बोस रुग्णालयात रुग्णाची हेळसांड केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. येथे वॉर्डब्वॉयने स्ट्रेचर न मिळाल्यामुळे रुग्णाला चादरीत गुंडाळून फरफटत एक्स-रे काढण्यासाठी नेले. ही घटना कधी घडली याची माहिती अद्याप मिळाली नाही. पण व्हिडिओ समोर आल्यानंतर डीनने तीन कर्माऱ्यांना निलंबित केले तर इतर दोघांना सेवा समाप्तीचे आदेश जारी केले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालय प्रशासनाला फरफटरत नेलेल्या रुग्णाचा तपास घेता आला नाही. या घटनेच्या तपासणीसाठी तीन सदस्यीय कमिटी स्थापन केली. एका आठवड्यात अहवाल देण्याचे कमिटीला सांगण्यात आले आहे. सहायक अधीक्षक डॉ.अरविंद शर्मा यांनी सांगितले की, सदरील प्रकरणात डीन डॉ. नवनीत सक्सेना यांनी सुरक्षा प्रभारी विकास नायडू, वॉर्डब्वॉय प्रभारी अमित दुबे, राजीव कश्यप आदींना निलंबित केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...