आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे असतील Alibaba चे नवीन बॉस, पुढच्या वर्षी Jack Ma यांना सोपवतील जबाबदारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आशियातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी Alibaba चे फाऊंडर Jack Ma कंपनीची जबाबदारी 2019 मध्ये सीईओ Daniel Zhang यांच्याकडे सोपवणार आहेत. Jack Ma यांनी कंपनीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. Jack Ma पुढीलवर्षी 10 सप्टेंबर म्हणजे 55 व्या वाढदिवसाला चेअरमन पदावरून निववृत्त होतील. पण ते 2020 पर्यंत बोर्डावर राहणार आहेत. जॅक मा म्हणाले होते की, निवृत्त झाल्यानंतर ते एज्युकेशनशी संबंधित फिलान्थ्रॉपी (समाज सेवा) ला वेळ देणार आहेत. तसेच ते नवीन स्वप्ने पादाक्रांत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

 
20 वर्षांपूर्वी सुरू केली होती कंपनी 
चीनच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीने सुमारे 20 वर्षांपूर्वी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये अलिबाबा कंपनीची सुरुवात केली होती. 2013 मध्ये ते सीईओ बनले. तर 2015 मध्ये त्यांनी झँग यांना सीईओ बनवले. त्यानंतर शांघाय-एज्युकेटेड सर्टिफाइट अकाऊंटंटने रिटेलर्स बदलण्याचा प्लॅन केला आहे. त्याला 'न्यू रिटेल' म्हटले गेले. या व्हिजनवर अनेक अब्ज डॉलर खर्च झाले आणि अलीबाबाने रिटेल स्टोर्समध्ये आपले स्थान मजबूत केले. 

 

काय म्हणाले जॅक.. 
जॅक मा या निर्णयाबाबत म्हणाले की, अलीबाबाची कमान Daniel आणि त्यांच्या टीमला सोपवणे हा योग्य वेळी केलेला योग्य निर्णय आहे. कारण त्यांच्याबरोबर काम करताना माझ्या लक्षात आले आहे की ते आता पूर्णपणे तयार आहे. सीईओ बनल्यापासून त्यांनी अत्यंत कुशाग्र पद्धतीने आणि व्यवहारिक कौशल्याने नेतृत्व केले आहे. 

 

Zhang मुळे वाढले व्हॅल्युएशन 
Zhang यांची नियुक्ती जॅक मा यांचे इतर हाय प्रोफाइल सहकारी व्हाइस चेयरमन Joseph Tsai ला ट्रॅक करणाऱ्यांसाठी आश्च्यकारक ठरली. तीन वर्षांपूर्वी सीईओ बनल्यानंतर झँग यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांनी मेगा इव्हेंट्स सारख्या अॅन्युअक सिंगल डे बोनांझाची सुरुवात केली. त्यांच्या कार्यकाळात अलिबाबा चे शेअर 87 टक्के वाढले आणि कंपनीची मार्केट व्हॅल्यू सुमारे 420 अब्ज डॉलरवर पोहोचली. ती टेनसेंट होल्डिंगपेक्षा जास्त आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...