आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅक मा सारखा दिसण्याचा झाला फायदा, ग्रॉसरी स्टोरच्या कमाईत झाली वाढ, सोशल मीडीयावर 13 लाख फॉलोअर्स...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनच्या झेजियांग प्रांताच्या तोगशांग शहरात अलीबाबा डॉट कॉमचे फाऊंडर जॅक मासारखा दिसण्याचा फायदा एका ग्रॉसरी स्टोर चालवणाऱ्या व्यक्तीला झाला. 39 वर्षीय वु शुएलिनला पाहून लोक त्यांना जॅम मा समजतात. सारखा चेहरा असल्यामुळे पूर्ण चीनमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. सोशल मीडीयावर त्यांच्या फोलोअर्सची संख्या 13 लाखांपेक्षा जास्त आहे.
 

या लोकप्रियतेनंतर वुने आपले नावही बदलले. सोशल मीडीयावर ते स्वत:ला लिटल जॅक मा म्हणतात. त्यांना पाहण्यासाठी दुरवरून लोक येतात आणि यामुळे त्यांच्या दोकानाचा बिझीनेसही वाढला आहे.


वु यांनी सांगितले की, अनेकवेळा दुकानात लोक त्यांना पाहून जॅक मा समजतात. अनेक लोक त्यांच्यासोबत सेल्फी घेतात, आणि त्यांना बॉस जॅक मा हाक मारतात.


वु यांचे माणने आहे की, जॅक सारखे दिसणे माझ्यासाटी गौरवाची गोष्ट आहे, खास बाब म्हणजे वु यांची गोष्ट जॅक मा यांच्यापर्यंतदेखील पोहचली आहे. जॅक मा यांनी वु यांना दुकानासाठी मदतीचा प्रस्तावदेखील दिला आहे, पण त्यांनी विनम्रतेने त्यांचाय प्रस्तावास नकार दिला आणि आपले दुकान सोडणार नसल्याचे सांगितले.


अलीबाबा कंपनीची ओनर आणि टेक आंत्रप्रेन्योर जॅक मा चीनमध्ये किती लोकप्रिय आहेत याचा अंदाज या गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की, एका व्यक्तीने त्यांच्यासारखे दिसण्यासाठी चेहऱ्याची प्लॅस्टीक सर्जरीदेखील करून घेतली. त्याशिवाय जॅक यांच्या सारख्या दिसण्याऱ्या एका मुलाचा फोटाही सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे त्यानंतर जॅक मा यांनी त्याच्या शिक्षणारा पूर्ण खर्च उचलला.

 

पुढील स्लाइडवर पाहा वुचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...