आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्कः सुपरस्टार जॅकी चॅनची मुलगी एटा नगने तिच्यापेक्षा वयाने 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केले आहे. दोघी जणी गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होत्या. दोघींनीही लग्नाची बातमी सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ आणि लग्नाचे सर्टिफिकेट शेअर करुन दिली. एटाने गर्लफ्रेंड एंडी ऑटमसोबत याच महिन्यात कॅनडा येथे लग्न केले. जॅकी चॅनकडून मुलीच्या लग्नाविषयी अद्याप कुठलेही वक्तव्य आलेले नाही.
एकमेकींना सांगितले पत्नी-पत्नी
एंडी ऑटमने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन लिहिले, 'पत्नी आणि पत्नीच्या रुपात आम्ही हाँगकाँगला परतलो आहोत. प्रेमाने आमचे डोळे उघडले आहेत. मी जे अनुभवतेय ते शब्दांत सांगणे सोपे नाही. आता मला कसलीच भीती वाटत नाही. आयुष्यभर मी स्वतःचा तिरस्कार करत होती, पण एटामुळे मला समजले की, माझ्यात खूप निगेटिव्ही भरली होती.'
एटावर नाराज आहेत वडील...
- मुलगी एटाच्या लेस्बिनय रिलेशनशिपविषयी समजल्यानंतर वडील जॅकी चॅनने तिला घराबाहेर काढले होते. एटा आणि तिची गर्लफ्रेंड एंडीने अनेक रात्री पुलाच्या खाली काढल्या होत्या.
- एटा माजी ब्यूटी क्वीन एलायने एंजी आणि जॅकी चॅनची मुलगी आहे. स्वतः जॅकी सार्वजनिक ठिकाणी कधीही मुलीविषयी बोलले नाहीत.
- वडिलांनी घराबाहेर काढल्यानंतर एटाजवळ जेवणासाठीही पैसे नव्हते. स्वतः एटाने याचा खुलासा यूट्युबवर एक व्हिडिओ पोस्ट करुन केला होता. एटाने तिच्या या परिस्थितीला आईवडिलांना जबाबदार ठरवले होते.
867 कोटींच्या संपत्तीचे मालक आहे जॅकी...
जॅकी चॅन सुमारे 867 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांचे लग्न जोआन लिनसोबत झाले. दओघांचा एक मुलगा असून जेसी चॅन हे त्याचे नाव आहे. मुलगा किंवा मुलीला ते आपली संपत्ती देऊ इच्छित नाहीत. मुलांऐवजी संपूर्ण प्रापर्टी चॅरिटीला देण्याची त्यांची इच्छा आहे. जॅकी यांच्या मते, जर मुलाला काम येत असेल तर तो स्वतः पैसा कमवले, आणि काम येत नसेल तर तो त्यांचा पैसा उडवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.