आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड गॉसिप: टायगर-दिशा यांच्यात पॅचअप करण्याचा प्रयत्न करत आहेत जॅकी आणि त्यांची पत्नी, एका अॅक्ट्रेसमुळे आला दोघांत दुरावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची सध्या बी टाऊनमध्ये चर्चा रंगत आहे. रिपोर्ट्सनुसार, टायगरचे वडील जॅकी  श्रॉफ आणि आई आयशा श्रॉफ दोघांमधील नाते पुर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जॅकी आणि आयशा या दोघांचे काउंसलिंग करत आहेत. टायगर आणि दिशा यांच्यात टायगरची को-अॅक्ट्रेस तारा सुतारियामुळे वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. दिशाला टायगर आणि तारा यांच्यात वाढत चाललेली मैत्री पसंत नाहीये. करण जोहरच्या आगामी 'स्टुडंट ऑफ द ईयर 2'मध्ये टायगर आणि तारा एकत्र काम करत आहेत.


एकेकाळी आयशा श्रॉफला पसंत नव्हती दिशा.. 
आज आयशा श्रॉफ मुलगा टायगर आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये पॅचअप घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा आयशा दिशाला पसंत करत नव्हती. तिने मुलाला दिशापासून दूर राहण्याची ताकिद दिली होती. पण टायगरने आईच्या म्हणण्याकडे कायम दुर्लक्ष केले आणि दिशासोबतची मैत्री कायम ठेवली.

 

- टायगर-दिशा यांचा 'बागी 2' हा चित्रपट हिट ठरल्यानंतर मात्र चित्र बदलले आणि आयशा दिशाला पसंत करु लागली. या दोघी अनेकदा एकत्र दिसल्या. 

 

टायगरने चित्रपटात जोडला kiss संदर्भात नवीन क्लॉज...
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, टायगरने चित्रपटात किस संदर्भात कॉन्ट्रॅक्टमध्ये नवीन क्लॉज जोडला आहे. या क्लॉजनुसार आता तो ऑनस्क्रिन कुठल्याही अभिनेत्रीला किस करणार नाही. खरं तर दिशामुळे टायगरला हा निर्णय घ्यावा लागला असेही म्हटले जात आहे. ऑनस्क्रिन दुस-या अभिनेत्रीसोबत टायगरचे इंटीमेट होणे दिशाला पसंत नाही. त्यामुळे टायगरने नो किसींग क्लॉज वापरला.

 

- टायगरच्या आगामी चित्रपटाविषयी सांगायचे म्हणजे तो लवकरच 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' मध्ये झळकणार आहे. यात चंकी पांडेची कन्या अनन्या पांडे आणि तारा सुतारिया लीड रोलमध्ये आहेत. 

 

- तर दिशाच्या आगामी चित्रपटाचे नाव 'भारत' आहे. यात दिशासोबत सलमान खान आणि कतरिना कैफ लीड रोलमध्ये आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे.  

बातम्या आणखी आहेत...