आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी रॉयल एनफील्डची रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल जीटी 650 खरेदी केली आहे. अलीकडेच ते मुंबईच्या रस्त्यांवर त्यांची नवीन बाइक चालवताना दिसले. खाकी पँट आणि ब्लू स्ट्रिप्ड शर्टमध्ये जॅकी दादांचा खास अंदाज त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळाला.
मुंबईत या मोटरसायकलची ऑनरोड किंमत 3.30 लाख रुपये आहे. फिचर्सविषयी सांगायचे म्हणजे 648 सीसीच्या या बाइकमध्ये टू- सिलेंडर फोर स्ट्रोक इंजिन असून त्यात 6 स्पीड गियर बॉक्स आहे. जॅकी दादांच्या चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास ते अलीकडेच प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर 'साहो' आणि संजय दत्त स्टारर 'प्रस्थानम'मध्ये झळकले होते. सध्या ते सलमान खान स्टारर 'राधे : योर मोस्ट वांटेड भाई' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी असून हा चित्रपट प्रभूदेवा दिग्दर्शित करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.