आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीतील गाजलेल्या 'व्हेंटिलेटर'चा गुजराती रिमेक, जॅकी श्रॉफ स्टारर फिल्मचा Trailer रिलीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडील आणि मुलाच्या नात्याला हळूवार स्पर्श करणारा राजेश म्हापूसकर दिग्दर्शित 'व्हेंटिलेटर' चित्रपटाचा गुजराती रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष, म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता जॅकी श्रॉफ गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मराठीतील 'व्हेंटिलेटर' या चित्रपटाच्या ट्रेलरची आठवण करुण देणारा हा ट्रेलर आहे. 

 

मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवणाऱ्या 'व्हेंटिलेटर'च्या गुजराती रिमेकची निर्मिती फाल्गुनी पटेल आणि लॉरेन्स डिसोझा यांनी केला आहे. मराठी 'व्हेंटिलेटर'मध्ये आशुतोष गोवारीकरांनी साकारलेल्या 'राजा' या मुख्य भूमिकेत जॅकी श्रॉफ आहेत.गुजरातीमधील 'व्हेंटिलेटर'च्या दिग्दर्शनाची धुरा उमंग व्यास यांनी सांभाळली असून पटकथालेखन प्रसिद्ध पटकथाकार निरेन भट्ट करणार आहेत. या चित्रपटात गुजराती फिल्म इंडस्ट्रीतील अनेक नावाजलेल्या कलाकारांनी अभिनय केला आहे. 14 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...