आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानचा फोटो आपल्या खिशात घेऊन फिरायचे जॅकी श्रॉफ, प्रोड्यूसर्सला करायचे शिफारस 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खानचा चित्रपट 'भारत' आज रिलीज होणार आहे. चित्रपटात जॅकी श्रॉफ सलमानच्या पित्याच्या रूपात दिसत आहेत. जॅकी श्रॉफ स्पेशल अपीरियंस रोलमध्ये आहेत. एका इंटरव्यूदरम्यान जॅकीने सांगितले की, सलमान माझ्या मुलासारखा आहे आणि एक वेळ अशी होती जेव्हा मी त्याचा फोटो आपल्या खिशात घेऊन फिरायचो.

 

प्रोड्यूसर्सला दाखवायचो सलमानचा फोटो... 
जॅकीने सांगितले, 1988 मध्ये आलेला चित्रपट 'फलक' च्यावेळी मी सलमानचे काही फोटोज काढले होते. ते फोटोज मी नेहमी आपल्या खिशात ठेवायचो आणि ते प्रोड्यूसर्सला दाखवायचो. फोटोज पहिल्यानंतर प्रोड्यूसर्सला सलमानला कास्ट करायला सांगायचो. त्यादरम्यान मी सलमानला चित्रपट मिळवून देण्यासाठी अनेक प्रोड्यूसर्सकडे चकरा मारल्या होत्या. कारण मला वाटायचे माझा मुलगा स्टार बनेल आणि आज त्याला खरंच माझा मुलगा होण्याची संधी मिळाली. जॅकी यांनी सांगितले की, चित्रपटात माझा रोल भले छोटा आहे पण संपूर्ण चित्रपटावर प्रभाव असतो त्याचा. त्यामुळे मी माझ्या रोलपासून खूप खुश आहे.