Home | International | Other Country | jacksonville shooting at video game tournament news and updates

फ्लोरिडामध्ये ऑनलाइन गेम टूर्नामेंट दरम्यान गोळीबार, तिघांचा मृत्यू, पराभवाने संतापला हल्लेखोर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 27, 2018, 08:30 AM IST

फ्लोरिडाच्या जॅक्सनविल एंटरटेन्मेंट कॉम्पेक्समध्ये गोळीबारात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. यात हल्लेखोराचा देखील समावेश आ

 • jacksonville shooting at video game tournament news and updates

  फ्लोरिडा (अमेरिका)- फ्लोरिडाच्या जॅक्सनविल एंटरटेन्मेंट कॉम्पेक्समध्ये गोळीबारात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. यात हल्लेखोराचा देखील समावेश आहे. या घटनेत जवळपास 11 जण जखमी झाले आहेत. ऑनलाईन व्हिडिओ गेम टूर्नामेन्ट दरम्यान ही घटना घडलीच. माध्यमातील वृतानुसार, हल्लेखाराने गेमिंग टूर्नामेंटमध्ये पराभव झाल्याने फायरिंग केली. आद्याप पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही.


  पोलिसांनी सांगितले की, 24 वर्षीय हल्लेखोराची ओळख पटली असून डेविड कॅट्ज असे त्याचे नाव आहे. घटनास्थळी त्याचा मृतदेह आढळून आला आहे. डेविड बाल्टीमोर येथील रहिवाशी होता. डेविडने घटनास्थळी स्वत:वर गोळी झाडली असे सांगण्यात येत आहे. जॅक्सनविल लँडिंग कॉम्पलेक्समध्ये गेम्स बार, 20 रेस्टॉरेंट आणि 70 दुकाने आहेत. घटना जीएलएच गेमबारमध्ये घडली, तेव्हा एका मॅडन 19 टूर्नामेंटसाठी क्वालीफाइंग राउंड सुरू होता.

  माझ्या अंगठ्यात गोळी लागली
  घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका 19 वर्षीय डिरिनी गोज्काने सांगितले की, एक गोळी माझ्या आंगठ्यात येऊन लागली. मी बलंबाल बचावलो. एक दुसऱ्या प्रत्यक्षदरर्शी रेयान अलमोनने सांगितले की फायरिंगचा आवाज ऐकून मी खाली वाकलो आणि रेस्टरूमकडे पळालो. मी जवळपास 10 मिनिटे तिथे थांबलो आणि त्यानंतर घटनास्थळाहून बाहेर पडण्यात यशस्वी झालो. मी अजूनही त्या धक्क्यात आहे.


  घटनास्थळी पोलिस दाखल...
  गेमिंग टूर्नामेंटचे आयोजन करणारी कंपनी ईए स्पोर्ट्सने सांगितले की, ते या प्रकरणात अधिकाऱ्यासोबत काम करत आहे. या कंपनीत जगभरातून 25 कोटीहून अधिक खेळाडू जोडलेले आहेत. पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी अजूनही काही लोक भयभीत होऊन लपलेले आहेत. परंतु, एक स्वाट टीम घटनास्थळी तपासासाठी पोहोचली आहे. फ्लोरिडाचे गवर्नर रिक स्कॉट यांनी सांगितले की, ते या घटनेवर नजर ठेऊन आहेत.

Trending