आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jacqueline Fernandez 33rd Birthday Special See Her Rare Modelling Audition Photo

एकेकाळी ऑडिशनसाठी रांगेत उभी दिसली होती जॅकलिन फर्नांडिस, बघा मॉडेलिंग डेचे PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2006 मध्ये दिल्लीत झालेल्या एका फॅशन शोच्या ऑडिशनसाठी रांगेत उभी असलेली जॅकलिन फर्नांडिस (डावीकडून दुस-या स्थानावर) - Divya Marathi
2006 मध्ये दिल्लीत झालेल्या एका फॅशन शोच्या ऑडिशनसाठी रांगेत उभी असलेली जॅकलिन फर्नांडिस (डावीकडून दुस-या स्थानावर)

मुंबईः श्रीलंकन ब्युटी क्वीन आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस जॅकलिन फर्नांडिसचा आज वाढदिवस आहे. 11 ऑगस्ट 1985 रोजी श्रीलंकेत जन्मलेल्या जॅकलिनने वयाची 33 वर्षे पूर्ण केली आहेत. जॅकलिनचे वडील श्रीलंकन, आई मलेशियन तर आजी-आजोबा कॅनडाचे आहेत. मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी जॅकलिन भारतात आली होती. 2009 साली 'अलादीन'द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या जॅकलिनने आतापर्यंत 'हाउसफुल (तिन्ही पार्ट्स), 'किक', 'जुडवा 2' या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले आहे.

 

2006 मध्ये पटकावला मिस श्रीलंकाचा किताब...

- जॅकलिन बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच एक मॉडेलसुद्धा आहे. 
- 2006 मध्ये तिने मिस श्रीलंका हा किताब आपल्या नावी केला होता. 
- 2006 मध्येच तिने लॉस एंजिलिसमध्ये झालेल्या मिस यूनिव्हर्स पीजेंटमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले होते.

 

आज जॅकलिनच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिचे मॉडेलिंगच्या काळातील खास फोटोज दाखवत आहोत...

बातम्या आणखी आहेत...