आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस नेहमी सोशल मीडियावर व्यायाम करतानाचे आपले व्हिडियो शेअर करत राहते. नियमित व्यायामासोबत पौष्टिक आहार तिच्या फिटनेसचे रहस्य आहे.
- ती दररोज जवळपास १५ मिनिटे वाॅर्मअप करते. - वेट लिफ्टिंग आणि कार्डियो एक्सरसाइजसह स्ट्रेचिंगही करते. - स्विमिंग व डान्सिंगचा तिच्या फिटनेस वेळापत्रकात समावेश आहे. - ती स्किपिंगही करते. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. - क्रंचेस आणि पुशअप्स तिचे शरीर फिट ठेवण्यास मदत करतात.
दिवसाची सुरुवात ग्रीन टीपासून
जॅकलीनच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने होते. तिच्या मते, या पाण्यामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ दूर करण्यास व अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते. ती दररोज सकाळी ग्रीन टी घेते. ती प्रोटीन शेकसोबत हिरव्या भाज्यादेखील खाते. सूप, उकडलेल्या भाज्या, वाटाणे, टोफू, पनीर, दही, दूध, मोड आलेली कडधान्येही खाते.
तिचा सल्ला
तुम्ही दुपारचे जेवण थोडे उशिरा केले तरी चालेल, पण डिनर नेहमी हलकेच असावे. यामुळे जेवण चांगले पचते आणि पोटदुखीची समस्या राहत नाही. याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरही दिसून येतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.