आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: आलिशान कारमधून फिरते जॅकलिन फर्नांडिस, गाड्यांच्या किंमती आहेत 2 आणि 3 कोटी रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकन ब्युटी क्वीन आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस जॅकलिन फर्नांडिसचा आज वाढदिवस आहे. 11 ऑगस्ट 1985 रोजी श्रीलंकेत जन्मलेल्या जॅकलिनने वयाची 33 वर्षे पूर्ण केली आहेत. जॅकलिनचे वडील श्रीलंकन, आई मलेशियन तर आजी-आजोबा कॅनडाचे आहेत. मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी जॅकलिन भारतात आली होती. 2009 साली 'अलादीन'द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या जॅकलिनने आतापर्यंत 'हाउसफुल (तिन्ही पार्ट्स), 'किक', 'जुडवा 2' या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले आहे. जॅकलिनने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. काही महिन्यांपूर्वीच मुंबईत घर घेण्याचे तिचे स्वप्न साकार झाले. याशिवाय तिच्याजवळ आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. जॅकलिनने लग्झरी गाड्यांची विशेष आवड आहे. तिच्या गॅरेजमध्ये दोन आणि तीन कोटी रुपये किंमतीच्या आलिशान गाड्या आहेत.

 

एक नजर टाकुयात जॅकलिनच्या कार कलेक्शनवर... 

बातम्या आणखी आहेत...