आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Gossip: एखाद्याच्या प्रेमात पडण्यापेक्षा मांजरावर प्रेम करणे चांगले, म्हणतेय जॅकलिन फर्नांडिस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आपल्या पसंतीच्या सेलिब्रिटीजच्या माहित नसलेल्या आतील गोष्टी जाणून घ्यायला त्यांचे चाहते उत्सुक असतात. वूट ओरिजिनल 'फिट अप विथ द स्टार्स' हा नवीन 10 एपिसोड्सचा शो घेऊन येत आहे. हा शो फॅशनिस्टा अनायता श्रॉफ अदजानीया होस्ट करीत आहे. या शोमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्या खासगी आयुष्याविषयीच्या अनेक गोष्टींचा उलगडा केला.  

 

जॅकलिनचे नातेसंबंध
जॅकलिन फर्नांडिस एक स्वतःच दिवा आहे. जेव्हा अनायाता श्रॉफ अदजॅनियाने जॅकलिनला तिच्या नाते संबंधांबद्दल विचारणा केली, तेव्हा ती म्हणाली "एखाद्या संबंधांमध्ये राहण्यापेक्षा मांजरावर प्रेम करणे अधिक चांगली गोष्ट आहे."

 

जॅकलिनला कोणत्या डेट्स आवडतात?
जॅकलिन फर्नांडिस देशातील तरुणांच्या हृदयावर राज्य करीत आहे. अनायाता श्रॉफ अदजानियाने तिच्या वूटवरील 'फिट अप विथ द स्टार्स' या कार्यक्रमात, जॅकलिनला विचारले की, तुला कोणत्या प्रकारची लोकं आणि कशा प्रकारच्या डेटिंग्स करायला आवडतात? यावर जॅकलिनने सांगितले की, मी कित्येकदा प्रवास करते आणि मला आयुष्यातील महत्त्वाच्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून देखील खूप आनंद मिळतो. एखाद्या व्यक्तीबरोबर जर डेटवर जायची इच्छा असेल तर ती व्यक्ती परिपूर्ण नसली तरी चालेल पण, जी चांगले कपडे घालू शकतो आणि जिच्यासोबत मी बिनधास्त वागू शकते, अशा व्यक्तीसोबत मी डेटवर जाणे पसंत करेन. जॅकलिनला तिच्या विशेष आवडत्या व्यक्ती सोबत नॉर्थन लाईट बघण्याची इच्छा आहे. 

 

आपल्याला जॅकलिन बद्दल माहित नसलेल्या गोष्टी...
फिट अप विथ द स्टार्स शोमध्ये जॅकलिनने तिच्या खासगी आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर केल्या. जॅकलिनने वयाच्या बाराव्या वर्षी काम करायला सुरवात केली. जॅकलिन बहुभाषी आहे, स्पॅनिश, फ्रेंच, अरेबिक या भाषा तिला चांगल्या प्रकारे बोलता येते. जॅकलिनला पोल डान्स खूप आवडतो. याशिवाय तिला बिंग हाऊस शो बघायला आवडतो आणि जेव्हा तिला काहीच करावेसे वाटत नाही तेव्हा ती गोड पदार्थ खाते.

 

जॅकलिन तुम्हाला स्वाईप करण्यासाठी काय गरजेचं आहे?
जॅकलिन फर्नांडिस स्वतःच दिवा आहे. जेव्हा अनायाता श्रॉफ अदजॅनियाने जॅकलिनला विचारले, तुला टिंडरवर स्वाइप करण्यासाठी काय भाग पाडेल? त्यावर जॅकलिन म्हणाली, "एक मनोरंजक प्रोफाइल असलेल्या आणि टिंडरवरील क्रिएटीव्ह फोटो असलेली व्यक्ती मला स्वाइप करायला भाग पडू शकते". 

बातम्या आणखी आहेत...