आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉट अंदाजात रॅम्पवर अवतरली जॅकलिन, म्हणाली - अनेकदा लैंगिक छळाची सुरुवात ही घरातूनच होत असते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस अलीकडेच एका फॅशन शोमध्ये आपला जलवा दाखवताना दिसली. रॅम्पवर क्लिक झालेली जॅकलिनची दिलखेचक अदा खास फोटोज मधून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. फॅशन शोनंतर जॅकलिन मीडियाशी बोलली. यावेळी तिला मी टू या मोहिमेविषयी विचारणा झाली. त्यावर तिने तिचे मत व्यक्त केले. 


जॅकलिन म्हणाली, "लैंगिक छळ हा चित्रपटसृष्टीशी निगडीतच आहे असे नाही. महिलांचे शोषण प्रत्येक ठिकाणी होते." अनेकदा घरातूनच महिला आणि मुलींच्या लैंगिक छळाला सुरुवात होते, असेही जॅकलिन यावेळी म्हणाली. 


सध्या चित्रपटसृष्टीत सुरु असलेल्या मीटू मोहिमेविषयी तिला विचारले असता, ती म्हणाली, "अन्यायाला वाचा फोडलीच पाहिले. महिलांनी याविषयावर बोलायला घाबरु नये. लैंगिक विषयावर चर्चा होत नाही. पण ती व्हायला हवी. दुर्दैवाने आपल्या चारही बाजुला महिलांचा लैंगिक छळ होतो, हे सत्य आहे." जॅकलिन पुढे म्हणाली, हा मुद्दा सेक्सविषयी नसून शक्ती संघर्षाविषयी आहे. 


जॅकलिनच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे म्हणजे, यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या सलमान खानच्या 'रेस 3'मध्ये जॅकलिन झळकली होती. या चित्रपटात ती जबरदस्त अॅक्शन करताना दिसली होती. 

बातम्या आणखी आहेत...