आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः बॉलिवूड अॅक्ट्रेस जॅकलीन फर्नांडिस फिट फिजिक आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. मिस श्रीलंका हा किताब तिने पटकावला होता. 33 वर्षीय जॅकलिन स्वतःचे डाएट आणि फिटनेस नियम कधीही मोडत नाही. तिच्या फिटनेसवरुन अनेकांनी प्रेरणा घेतली आहे. ख्रिसमस आणि न्यू इयरपूर्वी जॅकलिन आता डिटॉक्स डाएट घेत आहे. या डाएटच्या माध्यमातून तिचे आंतरिक शरीर स्वच्छ होईल. जॅकलिनने इंस्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या डिटॉक्स डाएटविषयीची माहिती दिली आहे.
हिरव्या भाज्या..
हेल्दी माइंड आणि बॉडीसाठी हिरव्या भाज्यांचे सेवन अतिशय गरजेचे असल्याचे जॅकलिन सांगते. शरीरातील टॉक्सिंस याच्या माध्यमातून बाहेर टाकले जाऊ शकतात. जॅकलिनसुद्धा हिरव्या भाज्या-पालेभाज्यांचा समावेश आपल्या डाएटमध्ये करते. यामध्ये पालक, लाल-पिवळ्या शिमला मिर्ची ती खाते.
क्विनोआ
जॅकलिनच्या डाएटमध्ये क्विनोआचा समावेश आहे. काही लोक याला शिजवून तर काही कच्चे खातात. हे एक हाय कर्बोहाइड्रेट फूड आहे. यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक असते.
अॅप्पल साइड विनेगर
जॅकलिन तिच्या ग्लोइंग स्किनसाठी ओळखली जाते. यासाठी ती अॅप्पल साइड विनेगर, हळद आणि अदरकाचा वापर करते. हळद आणि अदरकात अँटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत. याच्या मदतीने स्किन हेल्दी ठेवता येते. सोबतच इम्युन सिस्टमही मजबुत होते. या तिघांचा रस एकत्र करुन याचा वापर केला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.