UK / मुलगा रोज 8 तास मोबाइलवर गेम खेळायचा, आईला यायचा राग; पण आता ऑनलाइन गेम खेळून जिंकले तब्बल 7.5 कोटी रुपये

जेडने आपल्या साथीदाराच्या मदतीने फोर्टनाइट वर्ल्डकपमध्ये दुसरे स्थान पटकावले  
 

दिव्य मराठी

Jul 30,2019 02:13:00 PM IST

लंडन - येथील एका मुलाने व्हिडिओ गेम खेळून कोट्यवधी रुपयांची कमाई केली. 15 वर्षीय जेडन अॅशमॅन असे त्या मुलाचे नाव आहे. जेडनने फर्स्ट फोर्टनाइट या ऑनलाइन गेमच्या वर्ल्डकपमध्ये दुसरे स्थान मिळवत 7.7 कोटी रुपये जिंकले. जगभरात 25 कोटींपेक्षा अधिक लोकांना या गेमचे वेड लागले आहे.


जेडनने आपला सहकारी डेवे जोंगसोबत हा गेम खेळला. दोघांनाही 2.25 मिलियन डॉलर (15.50 कोटी रुपये) अधिक रक्कम जिंकली. ही रक्कम दोघांना वाटून देण्यात येणार आहे. जेडनने सांगितले, 'माझी आई नेहमीच मला रागवायची. तिला वाटाचये मी रुममध्ये बसून 8-8 तास फक्त गेमच खेळतो. मी माझा वेळ वाया घालत आहे. एकदा तर आईने मला रागाच्या भरात एक्सबॉक्स (व्हिडिओ गेमचे कंट्रोलर) फेकून मारले होते.'

30 देशांतून 100 गेमरची करण्यात आली निवड
हा ऑनलाइन गेम तब्बल तीन दिवस चालला. न्यूयॉर्कच्या एका टेनिस स्टेडियममध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. फोर्टनाइट वर्ल्डकपच्या सुरुवातीच्या टप्प्यात 4 कोटी गेमर्सनी सहभाग घेतला होता. यांमध्ये 30 देशांतील 100 गेमर्सची निवड करण्यात आली होती. हे सर्व गेमर 12 ते 40 वर्षांतील होते.

आईने केले कौतुक

तर दुसरीकडे आपल्या मुलाने मोठी रक्कम जिंकल्यावर जेडनच्या आईला आनंद झाला. जेडनची आई लिजा डेलमॅन म्हटल्या की, 'माझ्या मुलाचा मला अनेकवेळा राग आला. गेममुळे त्याचा अभ्यास मागे पडला होता. तशी तक्रार देखील मिळाली होती. पण तो बरोबर होता हे त्याने सिद्ध केले. जेडनने आयुष्यभर नोकरी करून देखील इतके पैसे कमवले नसते.'

X