Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Jadhav as NCP's city president, Pawar again working president

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी जाधव, कार्याध्यक्षपदी पवार यांना पुन्हा संधी

प्रतिनिधी | Update - Aug 15, 2018, 12:35 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशपातळीवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरसह १४ जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी

  • Jadhav as NCP's city president, Pawar again working president

    सोलापूर- राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशपातळीवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरसह १४ जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी भारत जाधव व कार्याध्यक्षपदी संतोष पवार यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. शहराध्यक्ष व कार्याध्यक्ष निवडीबाबत पक्षाने दोन वेळा मुलाखत प्रक्रिया राबविली होती.


    आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शहराध्यक्ष म्हणून जाधव व कार्याध्यक्ष म्हणून पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निवड कायम ठेवण्यात आली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने मेळावे, सदस्य नोंदणी व संघटन वाढविण्यावर भर असेल. शहरात पक्षाची ताकद वाढवणार असल्याचे शहराध्यक्ष जाधव व कार्याध्यक्ष पवार यांनी सांगितले.

Trending