आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय बदलला, वडिलांच्या नावे नव्हे, कलामांच्या नावेच देणार पुरस्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्‌डी यांनी शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे नाव मंगळवारी पुन्हा बदलून पूर्ववत केले. त्यांनी सोमवारीच डॉ. एपीजे कलाम प्रतिभा पुरस्काराचे नामांतर करून त्यास आपल्या वडिलांचे नाव दिले होते. ‘वायएसआर विद्या पुरस्कार’ या नावाने देणार अशी घोषणाही त्यांनी केली होती. परंतु, विरोधीपक्ष आणि मुस्लिम समुदायाकडून होणाऱ्या विरोधानंतर त्यांनी एक पाउल मागे घेतले.

सरकारी आदेशात मंगळवारी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, “सरकारने शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यांना दिले जाणारे पुरस्कार ‘वायएसआर विद्या पुरस्कार’ चे नामांतर करण्यात आले आहे. आता हे पुरस्कार पुन्हा ‘डॉ. कलाम प्रतिभा पुरस्कार’ याच नावाने ओळखले जाणार आहे. या पुरस्कारांचे वितरण माजी राष्ट्रपती मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त 11 नोव्हेंबरला केले केले जाणार आहे.”

तत्पूर्वी सोमवारी जगनमोहन यांनी घेतलेल्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी तीव्र विरोध केला होता. बाबूंनी ट्विट करून लिहिले, “डॉ. कलाम यांनी आपल्या प्रेरणादायी आयुष्यातून देशासाठी मोठे योगदान दिले. वायएस जगन सरकारने 'एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार' चे नाव बदलून "वायएसआर विद्या पुरस्कार’ करणे एका सन्मानित व्यक्तीचा अवमान आहे.” भाजप नेता लंका दिनकर आणि तेलुगू देशम पक्ष (तेदेप) च्या नेत्यांनी देखील या निर्णयास तीव्र विरोध केला होता.

बातम्या आणखी आहेत...