आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधाराची खंत कशाला?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आयुष्यात काहीच माझ्या मनासारखं घडत नाहीये, माझ्याच बाबतीत असं का?’ असे प्रश्न मनात सतत येत असतील तर लेख जरूर वाचा...

 

आपल्या मनाचे चेतन मन आणि अचेतन मन असे दोन भाग पडतात. चेतन मन म्हणजे ज्या मनाद्वारे आपण विचार करतो. अचेतन मन म्हणजे आपल्या भावनांची बैठक असलेले मन. आपले सृजनात्मक मन. आपण चांगला विचार केला तर चांगलेच होईल आणि वाईट विचार केला तर वाईटच होईल या पद्धतीने आपले अचेतन मन काम करत असते. 


चेतन मनाने केलेला कोणत्याही तऱ्हेचा विचार, कल्पना एकदा का अचेतन मनात झिरपली आणि ती अचेतन मनाने स्वीकारली की मग ती कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठीच्या कामाला ते लागते. ती कल्पना, ते उद्दिष्ट, ध्येय पूर्ण करण्यासाठीची साधनसामग्री गोळा करू लागते. अचेतन मन ध्येयप्राप्तीसाठी पछाड़ून जाते. आपल्याला ते वाईट मिळवून देईपर्यंत त्याला एका क्षणाचीही विश्रांती घ्यावी वाटत नाही. अंतिम उद्दिष्टासाठी ते अगदी वेडे होऊन जाते. आपले अचेतन मन जेव्हा एखादी गोष्ट, कल्पना स्वीकारते तेव्हा ते लगेच अंमलबजावणीसाठी तयार होते. आपले ध्येय साध्य करण्यासाठी, हव्या असलेल्या गोष्टीची जमवाजमव सुरू (उदा. व्यक्ती, वस्तू, ठिकाण) करते. त्याचबरोबर आपल्या मनाच्या तळाशी असणाऱ्या मानसिक, आध्यात्मिक नियमांना ते गती देऊ लागते. 
पण इथे एक गंमत आहे. आपल्या अचेतन मनाला चांगले-वाईट असे काही कळत नाही. त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी सारख्याच. सगळ्या कल्पना सारख्याच. आपले अचेतन मन एखाद्या सुपीक जमिनीसारखे आहे. म्हणजे त्याच्यात कसलेही बी रुजवून घ्यायचे आणि उगवून घ्यायचे एवढेच आणि असेच ते करते. म्हणजे आपण इथे हे लक्षात घेतले पाहिजे की आपण कडू बी (वाईट विचार) पेरले तर कडूच उगवणार आहे. म्हणजेच आपण वाईट कल्पना, विचार करत राहिलो तर आपले मन नकारात्मक पद्धतीने वापरले जाईल. आपले अचेतन मन त्याची सगळी ऊर्जा, त्रास, अडचणी, अपयश, द्विधा परिस्थिती निर्माण करण्यासाठी वापरेल. 


सर्व नकारात्मक विधानं जेव्हा आपण आपल्या मनात घोळवत असतो. त्या वेळी आपले अचेतन मन आपल्याला कुठलाच प्रतिसाद देत नाही. कसलेच सहकार्य करत नाही. तिथल्या तिथेच रेंगाळत बसते. वेळकाढूपणा करते. निर्णय घेत नाही. थोडक्यात आहे तिथेच आपण अडकून पडतो. आपल्या अचेतन मनाकडून काम करवून घेणेसुद्धा अगदी तसेच आहे. आपल्या मनात आपण सुस्पष्ट विचार, सुस्पष्ट कल्पना आणल्या पाहिजेत. तरच आपले अचेतन मन योग्य पद्धतीने काम करू लागेल.


आपण आपल्या अचेतन मनात सुस्पष्ट विचार, सुस्पष्ट कल्पना करत राहायचे. मग ते विचार अचेतन मनात झिरपेल. तिथे रुजेल. तिथून आपले अचेतन मन आपल्याला आपले अंतिम उद्दिष्ट मिळवून देण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची, सामग्रीची जुळवाजुळव करू लागते. आश्चर्य वाटेल इतक्या झपाट्याने आपल्याला अपेक्षित गोष्टी घडू लागतात. अशा पद्धतीने मग आपल्या विश्वासाप्रमाणे आपले अचेतन मन आपल्याला उद्दिष्ट मिळवून देते. अंतिम ध्येय मिळवून देते. 

बातम्या आणखी आहेत...