आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jagdish Khattar Maruti Suzuki | CBI Registers Case Against Former Maruti MD Jagdish Khattar

मारुतीचे माजी एमडी जगदीश खट्टर यांच्याविरुद्ध सीबीआय केस दाखल, 110 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मारुतीचे माजी एमडी जगदीश खट्टर यांच्याविरुद्ध सीबीआयने फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती जारी केली. सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार खट्टर आणि त्यांची कंपनी कारनेशन ऑटो इंडिया यांना 110 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणी आरोपी करण्यात आले आहे.

मारुती कंपनीत 1993 पासून 2007 पर्यंत होते कार्यरत

जगदीश खट्टर 1993 पासून 2007 पर्यंत मारुतीमध्ये कार्यरत होते. 2007 मध्ये रिटायर झाले तेव्हा ते एमडी पदावर होते. मारुतीमधून निवृत्ती घेतल्यानंतर 2008 मध्ये त्यांनी कारनेशन कंपनीची सुरुवात केली होती. ही कंपनी कार अॅक्सेसरीज आणि जुन्या कार विक्रीचा व्यवसाय करते. कारनेशनने 2009 मध्ये पंजाब नॅशनल बँकेकडून 170 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. 2015 मध्ये हे कर्ज एनपीए (नॉन परफॉर्मिंग अॅसेट) म्हणून घोषित करण्यात आले. यातून पीएनबीला 110 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात पीएनबीने गुन्हेगारी षडयंत्र आणि फसवणुकीचा खटला दाखल केला आहे.