आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय लोक शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते. साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते. हे कसे का घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊया... - साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला! - गंधक हा अत्यंत जड धातू असून एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही. - साखर ही कोलेस्टेरॉल वाढवते. कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. - साखरेमुळे शरीराचे वजन वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो. - साखर ही रक्तदाब वाढवते. - साखर ही मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे. - साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत. - साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तेवीस हानिकारक रसायने वापरली जातात. - मधुमेह होण्याचे साखर हे एक मुख्य कारण आहे. - साखरेमुळे पोटात जळजळ होते. - साखर ही शरीरातील ट्राय ग्लिसरॉइड वाढवते. - साखर हे पॅरालिसिसचा झटका अथवा लकवा होण्याचे एक मुख्य कारण आहे. - आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर करणे सुरू करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.