आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Remembrance: मुलाच्या मृत्यूने जगजीत सिंग यांना बसला होता धक्का, वाचा 10 खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुलाच्या मृत्यूने जगजीत सिंग यांना बसला होता धक्का, लग्नात गाऊन करायचे उदरनिर्वाह 
भारतात गजलचा उल्लेख होताच जे नाव सर्वप्रथम घेतलं जातं ते नाव म्हणजे जगजीत सिंग. आज (10 ऑक्टोबर) जगजित सिंग यांची सातवी पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी 2011 मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. जगजित सिंग यांनी आपल्या आवाजाच्या जादुने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या अकाली निधनामुळे गजल प्रेमींना मोठा धक्का बसला होता. 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला जगजित सिंग यांच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील.

 

जगजित सिंग यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण करण्यास त्यांच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. जगजित सिंग यांनी ब्युरोक्रेट व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगजित यांना आपल्या कुटुंबीयांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. 

 

  मुंबईत दाखल झाल्यानंतर जगजित सिंग यांना आर्थिक अचडणींचा सामना करावा लागला होता. आपल्या उदरनिर्वाहासाठी ते लग्न समारंभात गात होते. 


जगजित सिंग यांना एकुलता एक मुलगा होता. विवेक सिंग हे त्याचे नाव. मात्र 1990 साली एका कार दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या मुलाचे वय केवळ 21 वर्षे होते. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी दुःखद घटना होती. मुलाला गमावल्याचा त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. जगजित सिंग यांनी 'ना चिठ्ठी ना कोई संदेश...' ही गझल आपल्या मुलाच्या मृत्यूने दुःखी होऊन लिहिली होती. 


जगजित सिंग यांची पत्नी चित्रा सिंग आपल्या मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन करु शकल्या नाही. आपल्या मुलाच्या मृत्यूचा एवढा परिणाम त्यांच्यावर झाला, की त्यांनी गाणेच सोडून दिले होते. 'समवन समव्हेअर' हा त्यांचा शेवटचा अल्बम होता. या अल्बममध्ये जगजित सिंग आणि चित्रा सिंग यांनी एकत्र गाणी म्हटली होती. 


 अल्बमच्या विक्रीतून होणा-या नफ्यातील काही भाग गीतकारांना देण्याची पद्धत जगजित सिंग यांनी सुरु केली होती. सुरुवातीला गीतकाराला केवळ गाणं लिहून द्यायचे पैसे मिळत होते. अल्बमच्या विक्रीतून होणारा नफा त्यांना मिळत नव्हता. मात्र जगजित सिंग यांनी गीतकारांना नफा मिळवून देणे सुरु केले होते. 


जगजित सिंग यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. घरात वीज नसल्यामुळे त्यांना दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करावा लागायचा.  


डिजिटल सीडी अल्बम लाँच करणारे जगजित सिंग भारतातील पहिले संगीतकार होते. त्यांनी 1987 साली 'बियॉन्ड टाईम' या नावाने पहिला डिजिटल सीडी अल्बम लाँच केला होता. 

 

 पार्श्वगायक कुमार शानू यांना त्यांचा पहिला मोठा ब्रेक जगजित सिंग यांनीच दिला होता. 


1982 साली आयोजित करण्यात आलेल्या जगजित सिंग यांच्या 'लाईव अ‍ॅट रॉयल अल्बर्ट हॉल' यालाईव्ह कॉन्सर्टच्या तिकिट केवळ तीन तासांत विकल्या गेल्या होत्या. 


जगजित सिंग यांना एकुण सहा बहिणभावंड होती. यापैकी चार बहिणी आणि दोन भाऊ होते.  

बातम्या आणखी आहेत...