Home | Business | Auto | Jaguar XJ50 Special Edition; 100 kilometers per hour in 6.2 seconds

जग्वारने लाँच केली XJ50 स्पेशल एडिशन कार; 6.2 सेकंदांत ताशी 100 किलोमीटरचा वेग

क्षितिज राज | Update - Dec 08, 2018, 09:42 AM IST

जग्वार लँड रोव्हर इंडियाने भारतात आपली सर्वात महागडी एक्सजेची खास आवृत्ती लाँच केली आहे.

  • Jaguar XJ50 Special Edition; 100 kilometers per hour in 6.2 seconds

    नवी दिल्ली- जग्वार लँड रोव्हर इंडियाने भारतात आपली सर्वात महागडी एक्सजेची खास आवृत्ती लाँच केली आहे. गाडी एक्सजे ५० नाव दिले आहे. नावातील ५० अंक या मॉडेलच्या पन्नासाव्या वर्धापनदिनास समर्पित करते. स्टँडर्ड मॉडेलच्या स्पर्धेत यात अनेक अपग्रेड्स आहेत व केवळ डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहेत. एक्स शोरूम इंडिया किंमत सुमारे १.११ कोटी रु. आहे.

    जग्वारच्या या आवृत्तीत स्पेशल ऑटोबायोग्राफी स्टाइल फ्रंट व रिअर बंपर आहे. १९ इंच व्हिल्स आहेत. क्रोम रेडियेटर ग्रिल आहेत, रिअर व साइड व्हेंट्सवर बॅजिंग केली आहे.यात पांढरा, निळा, काळा व लाल रंगाचे पर्याय आहेत. इंटिरिअर बरेच बदलले आहे व नव्या सॉफ्ट ग्रेन डायमंड क्विल्टेड सीट्स दिले आहे. हेडरेस्टवर जग्वार लीपर लोगो आलेला दिसतो. सेंटर आर्मरेस्टवरही हा लोगो दिसतो. ब्राइट मेटल पॅडल्स असून एनोडाइज्ड गिअर शिफ्टर आहे. ३.० लीटरचा टर्बाेचार्ज्ड इंजिन असून ते ३०२ बीपीएच शक्ती देते. कार ६.२ सेकंदांत ताशी १०० किमी वेग पकडू शकते. जास्तीत जास्त ताशी २५० किमी वेग घेऊ शकते.

    नवी जग्वार एक्सजे ५० ची थेट स्पर्धा मर्सिडीझ-बेंझ एस-क्लास, बीएमडब्ल्यू ७ सिरीज, ऑडी ए८ व लेक्सस एलएस५०० शी आहे. ५० वर्षांपासून ही बिझनेस लीडर्स, सेलिब्रिटी, राजकारणी, राजघराण्यातील लोकांना ती अावडत आहे. ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कंपनीची ही आवृत्ती त्या सर्वांचे आभार मानण्याचे माध्यमही आहे.

Trending