आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर ते कन्याकुमारी.... हॉट एअर बलूनद्वारे 11 लष्करी जवानांची माेहीम, 10 हजार फूट उंचीवर उडणारे हे बलून कापणार 3226 किलाेमीटर अंतर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - संपूर्ण देशाला भारतीय लष्कराच्या साहसी कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी भारतीय लष्कराची साहसी बटालियनचे जवान काश्मीर ते कन्याकुमार दरम्यान ३२२६ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी दाेन हाॅट एअर बलूनद्वारे 'मिशन जय भारत' हा माेहिमेवर निघाले अाहेत. जमिनीपासून सुमारे १० हजार फूट अंतरावरुन हे बलून मार्गक्रमण करतात. शनिवारी संध्याकाळी अकाेल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणावर या दोन हॉट एअर बलूनचे आगमन झाले होते. रविवारी सकाळी ते पाहण्यासाठी अकाेलेकरांनी गर्दी केली हाेती. त्यांना भारतीय एकात्मतेचे दर्शन घडवत हे जवान नांदेडकडे रवाना झाले. 

 

जम्मू येथील झोरावर स्टेडियम येथून सुरू झालेली ही मोहीम देशभरातील जवळपास ३१ स्थानकांवर थांबा घेऊन अापला प्रवास पूर्ण करणार अाहे. रविवारची पहाट अकोलेकरांसाठी खऱ्या अर्थाने कुतूहलाची ठरली. शहरातील आबालवृद्ध सकाळी साडेपाच वाजेपासूनच बहुसंख्येने विद्यापीठाच्या क्रीडांगणावर दाखल झाले होते. कर्नल विवेक तेहलावत यांनी मोहिमेचे उद्दिष्ट, प्रवासातील रोमांच विशद केले. 

 

अमरावती परिसरात भरकटले बलून : अकाेल्याकडे शनिवारी जात असताना अमरावती जिल्ह्यातील निंभारी- साेनगाव (ता. अंजनगाव सुर्जी) दरम्यान हवेचा दाब कमी झाल्याने हे हाॅट एअर बलून भरकटले हाेते. त्यामुळे या माेहिमेवरील जवानांना अाकस्मिक लँडिंग करावे लागले. मात्र नंतर शनिवारी सायंकाळी हे बलून अकाेल्यात अाले अाणि रविवारी सकाळी नांदेडकडे रवाना झाले. 

 

छाेट्या बलूनमध्ये ३, माेठ्या बलूनमध्ये ८ जवान 
दोनपैकी एका लहान बलूनच्या बकेटमध्ये तीन तर मोठ्या बलूनच्या बकेटमध्ये आठ जवान अाहेत. हे दोन्ही बलून फुगवण्यासाठी ४ पंखे आणि ८ सिलिंडरमधील वायूची आवश्यकता पडते. हवा व वायूच्या माध्यमातून या बलूनमधील वातावरण एका विशिष्ट अंतरापर्यंत हॉट (गरम) ठेवावे लागते, त्याकरिताच गॅसचा उपयोग केला जातो. जागेवरून हवेत सोडण्यापूर्वी बलूनमध्ये हवा व गॅस कसा भरण्यात येतो, बकेटमध्ये बलून हाताळण्यासाठी कशी यंत्रणा आहे, ती हाताळणारा सैनिक काय दक्षता घेतो याचे प्रात्यक्षिक जिथे हे बलून उतरतात तेथील लाेकांना पाहायला मिळते. 

बातम्या आणखी आहेत...