social / जायकवाडी @९७.४५% गाेदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

छाया : बाळू आहेर छाया : बाळू आहेर

सिंचनाचा प्रश्न मिटला

रमेश शेळके

Sep 14,2019 08:10:00 AM IST

पैठण : मराठवाडा अद्यापही दुष्काळाच्या छायेत असताना जायकवाडी धरणात आवक सुरू असल्याने धरणाचा पाणीसाठा शुक्रवारी ९७.४५ टक्क्यांवर आला असून वरील धरणांतून १८४६९ क्युसेक वेगाने आवक सुरू आहे. गाेदाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काेणत्याही क्षणी खालील धरणांत पाणी साेडण्याची शक्यता पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी वर्तवली आहे.


नाशिकच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यावर जायकवाडी धरणाचा साठा ९७.४५ टक्क्यांवर आला आहे. या पाण्याने मात्र मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे. सन २०१७ ला व त्याच्या ११ वर्षांपूर्वी १०० टक्के भरले हाेते. आता नाशिक भागात झालेल्या पावसाने धरणाचा पाणीसाठा १०० टक्क्यांवर येत आहे.


मराठवाड्यातील ओलिताखाली आलेले शेतीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
औरंगाबाद ९०५२
जालना ३६५८०
परभणी ९७४४०
अहमदनगर २२००
बीड ३७७९७९
एकूण १८३३२२


पाच जिल्ह्यांना फायदा
सध्या जायकवाडीत ९७.४५ टक्के पाणीसाठा आहे. यावर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,परभणी, बीड व नांदेड या जिल्ह्यांतील शेतीसह पाण्याचा पाणीपुरवठा होतो.


सिंचनाचा प्रश्न मिटला

धरणाचा साठा शंभर टक्क्यांकडे जात असल्याने मराठवाड्यातील १ लाख ८३ हजार हेक्टर सिंचनाला पाणी देता येईल.


आवक सुरूच
आवक सुरूच आहे. त्यावर ९७.४५ टक्के पाणीसाठा झाला आहे. काेणत्याही क्षणी खालील धरणांत पाणी सोडण्यात येईल. राजेंद्र काळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, पैठण

X
छाया : बाळू आहेरछाया : बाळू आहेर
COMMENT