पैठण / जायकवाडी धरणाचे दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले, पाणीसाठा शंभर टक्के; विसर्ग सुरू

धरणाच्या चार गेटमधून दोन हजार क्युसेक वेगाने गोदावरी पात्रात विसर्ग

Sep 16,2019 07:57:00 AM IST

पैठण । जायकवाडी धरणाचा पाणीसाठा रविवारी दोन वर्षांनंतर शंभर टक्के झाला. १५ आॅगस्टला बंधाऱ्यांत पाणी सोडल्यानंतर रविवारी धरणाच्या चार गेटमधून दोन हजार क्युसेक वेगाने संध्याकाळी साडेसहा वाजता गोदावरी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. यानंतर होणारी आवक पाहून विसर्ग कमी-अधिक करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे व अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.


जायकवाडी धरणातून सध्याचा विसर्ग : क्र.10,17,18,27 या गेटमधून सध्या पाचशे क्युसेक, तर पैठण जलविद्युत केंद्रामधून 1589 क्युसेक विसर्ग नदीपात्रात चालू आहे. पाण्याचा हा विसर्ग पाहण्यासाठी हजारो पर्यटकांनी सकाळपासूनच धरण परिसरात गर्दी केली होती.

X