आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस बंदाेबस्तात नाशिकहून सुटणार जायकवाडीसाठी पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नगर- नाशिककरांचा विराेध डावलून गाेदावरी व पालखेड धरण समूहातून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणाला पाणी साेडण्याच्या हालचाली पाटबंधारे विभागाने सुरू केल्या अाहेत. त्यासाठी संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची ठिकाणेही निश्चित केली आली असून सोमवारपासून (दि. २९) त्यांना संबंधित ठिकाणी तैनात राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

या पार्श्वभूमीवर साेमवारी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी अाणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक हाेणार अाहे. पाणी साेडण्यास नाशिकमधून तीव्र विराेध हाेत असल्यामुळे पाेलिस बंदाेबस्तात पाणी साेडण्याचे नियाेजन प्रशासनाने केले अाहे. पाणी साेडण्याच्या २४ तास अाधी पाेलिस विभागाला याची माहिती दिली जाईल.

बातम्या आणखी आहेत...