आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माओवाद्यांकडून कारागृहामधील अन्य कैद्यांच्या भावना भडकवण्याचा धोका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सीपीआय माओवादी या बंदी घालण्यात अालेल्या संघटनेशी संबंधित असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेले सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे, शाेमा सेन, राेना विल्सन, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, व्हर्नन गाेन्साल्विस हे सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात अाहेत. हे कैदी यापूर्वीच कारागृहात असलेले नक्षलवादी के. मुरलीधरन, अरुण भेलके, कांचन ननावरे यांच्याशी संगनमत करून कारागृहातील इतर कैद्यांच्या भावना भडकवून त्यांना बंदी घालण्यात अालेल्या संघटनेशी जाेडू शकतात. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा धाेक्यात येऊ शकते. त्यामुळे ढवळे, गडलिंग, सेन, राऊत यांना दुसऱ्या कारागृहात हलवण्यात यावे, असा अर्ज येरवडा कारागृह प्रशासनाने पुणे न्यायालयास दिला अाहे. कारागृहातील अपुऱ्या पाेलिस मनुष्यबळामुळे संबंधितांच्या सुरक्षिततेसाठी तारेवरची कसरत प्रशासनाला करावी लागत असून माअाेवाद्यांच्या सततच्या न्यायालयातील तक्रारींमुळे कारागृह अधिकारी त्रस्त झाल्याचे चित्र अाहे. 

 

येरवडा कारागृहातील सर्व कैद्यांची सुरक्षितताअाणि कायदा व सुव्यवस्था महत्त्वपूर्ण असल्याने संबंधित कैद्यांना अाैरंगाबाद, नाशिक काेल्हापूर कारागृहात हलवण्यात यावे, अशी मागणी न्यायालयाकडे कारागृहाने केली आहे. अद्याप त्यावर काेणताही निर्णय न झाल्याने कारागृह अधिकारी हवालदिल झाले अाहेत. या तिन्ही कारागृहांत व्हिडिअाे काॅन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध असून पुणे न्यायालयातील सुनावणीवेळी त्यांची व्हिडिअाे काॅन्फरन्सिंग सुनावणी झाल्यास कारागृह प्रशासनाचा ताण कमी हाेर्इल, असे सुचवण्यात अाले अाहे. सीपीअाय माअाेवादी या बंदी घालण्यात अालेल्या संघटनेचे सदर सदस्य बेकायदेशीरीत्या बंदी घातलेल्या संघटनेचे कामकाज करत असून देशाची अखंडता, सुरक्षितता अाणि सार्वभाैमत्व धाेक्यात अाणू शकतात, असेही सांगण्यात अाले अाहे. 

 

गडलिंग, राऊतकडून तक्रारींचा पाढा 
येरवडा कारागृहात बंदी असलेले सुरेंद्र गडलिंग व महेश राऊत सातत्याने विविध तक्रारी, मागण्यांचे अर्ज न्यायालयात देत अाहेत. गडलिंगने पुस्तके, अावश्यक दैनंदिन गाेष्टी मिळत नाहीत, अस्वच्छतेचे साम्राज्य अशा विविध तक्रारी केल्या अाहेत. कारागृहात ड्रायफ्रूट देण्याची त्याची मागणी नुकतीच न्यायाधीशांनी फेटाळून लावली. कारागृहात सायबर कायद्याचे शिक्षण घ्यावयाचे असून त्यासाठी लॅपटाॅप, वायफायची त्याने केलेली मागणीही फेटाळली. तर, अापणास रुग्णालयात नेले जात नाही, तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेऊ देत नाही, विविध चाचण्यांची परवानगी देत नाही, रुग्णालयाची कागदपत्रे मिळत नाहीत, अशा तक्रारी महेश राऊतकडून येत आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासन वारंवारच्या तक्रारींनी त्रस्त झाले अाहे. 

 

तुरुंगाची क्षमता २३२३ कैद्यांची, भरणा मात्र ५५०० बंदीवानांचा 
येरवडा मध्यवर्ती कारागृहाची पुरुष कैद्यांची क्षमता २३२३, तर महिला कारागृहाची क्षमता १२६ अाहे. मात्र, प्रत्यक्षात सध्या कारागृहात ५,५०० पेक्षा अधिक कैदी असून त्याचा अतिरिक्त साेयी-सुविधांचा ताण कारागृह प्रशासनावर पडत अाहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात अालेले ४० ते ४५ कैदी, मुंबर्इ बाॅम्बस्फाेट खटल्यातील कैदी, काेपर्डी गुन्ह्याचे कैदी येरवडा कारागृहात अतिसुरक्षित बराकीत ठेवण्यात अालेले अाहेत. तर, गजा मारणे टाेळी, नीलेश घायवळ टाेळी, बाेडके टाेळी, माळवदकर-दांगट टाेळी, माेहाेळ टाेळी, भार्इ ठाकूर टाेळी, अरुण गवळी टाेळीतील गंभीर गुन्ह्यांतील अाराेपी येरवडा कारागृहात असून त्यांची पुणे सत्र न्यायालयात सुनावणी सुरू अाहे. 

 

एक हजार पोलिसांची गरज, प्रत्यक्षात सुरक्षेत ४५० तैनात 
येरवडा कारागृहातील साडेपाच हजार कैद्यांवर देखरेख ठेवण्यासाठी १ हजार पाेलिस कर्मचाऱ्यांची अावश्यकता अाहे. मात्र, प्रत्यक्षात ४५० पाेलिसच उपलब्ध असल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत अाहे. महत्त्वपूर्ण कैद्यांच्या सुरक्षेकरिता प्रत्येक कैद्यामागे एक पाेलिस, पाेलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या रजा, अाजारपण यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या कारागृहास भेडसावत अाहे. त्यामुळे अतिरिक्त ५०० मनुष्यबळ देण्यात यावे, असा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने दिला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...