आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jain, Gujarati Organisations Impose Ban On Pre wedding Shoot, Male Choreographers For Sangeet

जैन, गुजराती संघटनांकडून प्री वेडिंग शूट्सवर बंदी, संगीतमध्ये पुरुष कोरिओग्राफर्स 'अश्लीलता!'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - महाराष्ट्रासह देशभर प्री-वेडिंग शूटची क्रेझ सुरू आहे. यात लग्नाच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी नवरी आणि नवरदेव एकमेकांसोबत फोटो सेशन करत असतात. केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित असलेले हे चलन आता छोट्या शहरांमध्ये सुद्धा प्रसारित होत आहे. वेडिंग फोटोग्राफी आणि शूटिंगसोबत आता लोक प्री-वेडिंग शूटचे देखील करार करत आहेत. परंतु, आता याच चलनावर बंदी आणली जात आहे. मध्य प्रदेशातील जैन समुदाय आणि गुजराती समुदायाच्या संघटनांनी यावर बंदी आणली आहे. हीच बंदी गुजराती आणि जैन समुदायाने देशभर अंमलात आणावी असे निर्देश या संघटनेच्या वतीने देण्यात आले आहेत.

समाजातून बहिष्कृत करण्याचा दिला इशारा

जैन आणि गुजराती संघटनांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्यानुसार, "लग्नापूर्वी केले जाणारे प्री-वेडिंग शूट थांबवले जाली. आम्ही अशा स्वरुपाचा संदेश आणि पत्रक व्हायरल करत आहोत. आमच्या सर्वच सदस्यांना सांगण्यात आले आहे, की त्यांनी देखील प्री-वेडिंग फोटो शूट करू नये. सोबतच, लग्नात संगीत सेरेमनीसाठी डान्स शिकवताना किंवा महिलांच्या कार्यक्रमांमध्ये पुरुष कोरिओग्राफरला नेमले जाऊ नये." भोपाळ गुजरात समाज आणि गुजरात समाजाचे राष्ट्रीय सरचिटणीस संजय पटेल यांनी ही माहिती दिली. ज्या सदस्यांनी या बंदीला विरोध केला किंवा त्याची अंमलबजावणी केली नाही, त्यांना समाजातून बहिष्कृत केले जाईल. केवळ मध्य प्रदेशच नव्हे, तर देशभरातील गुजराती समुदायांमध्ये ही बंदी लागू केली जात आहे असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

लेडीज फंक्शनमध्ये पुरुष कोरिओग्राफर बालावणे अश्लीलता

जैन समुदायाचे भोपाळ येथील अध्यक्ष प्रमोद हिमांशू जैन यांनी सुद्धा ही बंदी लागू करण्याचे आवाहन केले. प्रमोद हिमांशू जैन म्हणाले, "जैन समुदायातील आध्यात्मिक गुरूंनी प्री-वेडिंग फोटो शूटवर आक्षेप घेतला होता. त्यानुसारच, ही बंदी लागू केली जात आहे. आध्यात्मिक गुरूंचा संगीत आणि लेडीज फंक्शनमध्ये होणाऱ्या शूटिंगमध्ये पुरुष कोरिओग्राफरच्या प्रवेशाला सुद्धा विरोध आहे. संगीत आणि लेडीज फंक्शनमध्ये पुरुषांनी रेकॉर्डिंग आणि फोटोग्राफी करण्यास जैन गुरूंनी अश्लीलता म्हटले आहे. जैन समुदाय यापुढे प्री-वेडिंग शूट किंवा महिलांमध्ये पुरुष फोटोग्राफर / कोरिओग्राफरला परवानगी देणार नाही."

सिंधी समुदायानेही केले बंदीचे समर्थन

भोपाळच्या सिंधी पंचायतचे अध्यक्ष भवन देव इस्राणी यांनी देखील या बंदीला समर्थन दिले आहे. लवकरच सिंधी समुदायाकडून सुद्धा अशाच स्वरुपाचे पत्रक काढले जाईल. यावर सिंधी समुदाय बैठक घेणार आहे. त्यामध्ये प्री-वेडिंग फोटोशूट आणि पुरुष कोरिओग्राफर बॅन केले जाणार आहेत. अशा स्वरुपाच्या कार्यक्रमांमुळे कुटुंबियांना समाजात अपमान सहन करावा लागतो.

बातम्या आणखी आहेत...