घटत्या लोकसंख्येमुळे जैन / घटत्या लोकसंख्येमुळे जैन समाजाची ‘हम दो, हमारे तीन’ ची घोषणा

मध्य प्रदेशातील  इंदूर येथे  जैन महासमितीचा शपथविधी समारंभ रविवारी अतिशय क्षेत्र गोम्मटगिरी  येथे पार पडला.

Feb 26,2019 10:55:00 AM IST

इंदूर - मध्य प्रदेशातील इंदूर येथे जैन महासमितीचा शपथविधी समारंभ रविवारी अतिशय क्षेत्र गोम्मटगिरी येथे पार पडला. या कार्यक्रमास ११ राज्यांतून आलेले महासमितीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या समारंभात ‘हम दो, हमारे तीन’ अशा प्रस्तावासह विविध प्रस्ताव मंजूर करण्यात आले.


राष्ट्रीय अध्यक्षपदाची शपथ घेणारे अशोक बडजात्या , महासमित मध्यांचलचे अध्यक्ष डी. के. जैन व महामंत्री जैनेश झांझरी यांनी सांगितले, महासमितीचे ३५५ सदस्य, मध्य प्रदेश व इंदूर येथील ६०० श्रेणी सदस्यांनी समाजाची संख्या घटत चालल्याने चिंता व्यक्त केली आहे. यावर त्यांनी समाजहित लक्षात घेऊन एक संकल्प घेण्याचा निर्धार केला. ‘हम दो, हमारे तीन’ चा नारा देशभरात पोहचविण्यात येणार आहे. यावेळी बडजात्या यांनी सांगितले, गरजू व्यक्तीच्या तिसऱ्या अपत्याच्या शिक्षणाचा खर्च महासमितीकडून करण्यात येईल. या घोषणेस सर्वांनी संमती दर्शवली. समाजात घटस्फोटाची समस्या वाढत चालली आहे. यावरही चिंता व्यक्त करून परिवारातील तरुण-तरुणींना सुसंस्कृत बनवण्याचा निर्धार केला. यासाठी चर्चासत्र, वर्कशॉप आयोजित करण्यात येत असल्याचेही सांगितले.


या कार्यक्रमात राष्ट्रीय महामंत्री सुरेंद्र पंड्या, जयपूर व राष्ट्रीय काेशाध्यक्ष सतीश जैन, हरियाणा यांची एकमताने निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष बडजात्या म्हणाले, वरिष्ठ कार्याध्यक्ष महेंद्र पाटणी , जयपूर व चेअरमन विपिन जैन सराफ, मेरठ, नवीन जैन, गाझियाबाद, आदींची निवड करण्यात आली. आजवर ५२ विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी झाल्याची माहिती देण्यात आली.


सदस्य संख्या एक लाख करणार
महासमिती समाजाचा सर्वमान्य आवाज बनली पाहिजे, यासाठी सदस्यांची संख्या ६० हजारांवरून १ लाख करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महासमिती सर्व पंथ समभावावर विश्वास ठेवते. यासाठी तेरा पंथ, बीस पंथ आणि कांजी पंथ आदी सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याचे आपले धोरण आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मानवाधिकार आयोगाचे चेअरमन व माजी न्यायमूर्ती एन. के. जैन यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. समाजाच्या उत्थानासाठी बंधुभाव, समन्वय, सद््भावाचे वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचा संकल्प करण्यात आला. जैन म्हणाले, संपूर्ण जागृतीसह होतकरू मुलांना कमीतकमी शुल्कावर एमपीएससीची तयारी करून घेण्यासह मानव कल्याणाचे कार्य केले जाईल.

X