आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jaipur News Son Shot Himself By Father Pistol One Day After Death Of Girlfriends

ज्या स्मशानभुमीत एक दिवसापूर्वी गर्लफ्रेंडचा झाला अंत्यसंसंकार, तेथे जाऊन मुलाने केली आत्महत्या...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- स्मशानभूमीत आपल्या कारमध्ये बसून वडिलांच्या लायसेंस पिस्तुलने मुलाने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मतृदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. मुलाचे नाव करनी सिंह(23) आहे. पोलिसांना त्याच्या कारमध्ये सुसाइड नोट मिळाली. त्याने भाऊ आणि बहिणीसाठी लिहीले, मी जिवंत असूनही जिवंत नसल्यासारखा आहे, मला आयुष्यात आता काहीच रस उरला नाहीये त्यामुले पप्पाच्या पिस्तुल चोरून मी आत्महत्या करत आहे.


वडिलांची पिस्तुल चोरली
पोलिस आधीकारी मानवेन्द्र सिंह यांनी सांगितले की, करनी सिंहचे वडील महेन्द्र सिंह रिटायर्ड बीएसएफ जवान आहेत, आणि सध्या ते एका प्रायव्हेट कंपनीत सिक्योरीटीचे काम करतात. त्यांनी त्यांची लायसेंस पिस्तुल बॅगमध्ये ठेवली होती. करनीने दुपारी त्यांच्या बॅगमधून पिस्तुल घतली आणि शामनगरच्या स्मशानभुमीत गेला. तेथे त्याने कार लॉक केली आणि डोक्यावर पिस्तुल ठेऊन गोळी झाडली.

 

प्रियसीने केली आत्महत्या
करनीची गर्लफ्रेंडने एक दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती, आणि तिचा अंत्यसंस्कार त्याच ठिकाणी झाला होता. करनीच्या वडिलांना याबद्दल काहीच माहिती नाहिये. पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...