आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूरच्या राजकुमारी दिया-नरेंद्रसिंह परस्पर संमतीने 24 वर्षांनंतर विभक्त; न्यायालयाकडून घटस्फोट मंजूर 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- जयपूरच्या राजघराण्याच्या सदस्या आणि माजी आमदार दियाकुमारी व त्यांचे पती नरेंद्रसिंह यांचा २४ वर्षांनंतर परस्पर संमतीने घटस्फोट झाला आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या या आदेशाची प्रत मंगळवारी जारी झाली. दिया व नरेंद्र यांना तीन अपत्ये आहेत. त्यांचा मोठा मुलगा पद्मनाभसिंहला महाराज भवानीसिंह यांनी दत्तक घेऊन आपला वारस नियुक्त केले आहे. लक्ष्यराजसिंह हा दुसरा मुलगा व गौरवी ही एक मुलगी आहे. दियांनी अल्पवयीन मुलांना आपल्यासोबत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दिया या आपला कौटुंबिक वारसा सिटी पॅलेस व जयगड किल्ल्यासह इतर इमारतींच्या वारसा संरक्षणाचे काम करत आहेत. 

 

दिया या माजी महाराज सवाई भवानीिसंह व पद्मनी यांच्या कन्या आहेत. त्यांनी जयपूर, दिल्ली व लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केले. २०१३ मध्ये त्या भाजपच्या तिकिटावर सवाई माधोपूरमधून आमदार बनल्या. नरेंद्रसिंह हे शिवाडच्या कोठडा येथील आहेत. 


सव्वा महिन्यातच न्यायालयाने प्रकरण निकाली काढले, कारण... 

दिया व नरेंद्र यांनी गेल्या वर्षी ७ डिसेंबरला कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. कोर्टाने समुपदेशनाचा कालावधी ग्राह्य धरून सहा महिन्यांनंतरची तारीख दिली. मात्र, दोघांनी २१ डिसेंबरला कोर्टात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका निकालाचा संदर्भ देत लवकर सुनावणी करण्याची मागणी केली. दीड वर्षापासून विभक्त असल्याचे सांगून परस्पर संमतीने घटस्फोट हवा असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर कोर्टाने तत्काळ घटस्फोट मंजूर केला. सुप्रीम कोर्टाने अमरदीप विरुद्ध हरमीन कौर प्रकरणात म्हटले होते की, पक्षकार १८ महिन्यांपासून वेगळे असतील आणि विभक्त होऊ इच्छित असतील तर सहा महिन्यांचा कालावधी देण्याऐवजी पुराव्यांआधारे लवकर निकाल दिला जाऊ शकतो. 
 

बातम्या आणखी आहेत...