आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमधून लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदने भारत आणि अफगानिस्तानात हल्याचा कट रचला- अमेरिका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद भारत आणि अफगानिस्तानमध्ये हल्ला करण्याचा कट रचत आहेत. अमेरिकेतील परराष्ट्र मंत्रालयाने या आठवड्यात जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये या गोष्टी खुलासा करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, पाकिस्तानने अद्याप या संघटनांवर कोणतीही कारवाई केलेली नाहीये. पाकिस्तानकडून या संघटनातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि फंड देऊन संगठीत केले जात आहे. भारतात झालेल्या अनेक हल्यामध्ये या संघटनांचा हात आहे.
रिपोर्टनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये सीमेच्या पलीकडून होणाऱ्या हल्यासाठी भारताने पाकिस्तानला जबाबदार ठरवले आहे. भारताने आपल्या सीमेत दहशतवाद्यांचे तळ शोधून काढणे, त्यांचा खात्मा करणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकने सुरुच ठेवले आहे. रिपोर्टमध्ये पाकिस्तानवर अफगानी तालिबान आणि हक्कानी नेटवर्कसारख्या संगठनांना देशात बंदी न घातल्याचा आरोपही लावण्यात आला आहे.2018 मध्ये सामान्य नागरिक, पत्रकार, नेता आणि शाळांना टार्गेट केले
 
रिपोर्टनुसार, पाकिस्तानी सरकार लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदला देशात फंड गोळा करणे, दहशतवाद्यांना भर्ती करणे आणि त्यांच्या प्रशिक्षणाला थांबवण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. मागील निवडणुकीत पाकने लष्कराशी संबंध असलेल्या लोकांनाही निवडणुकीत भाग घेण्याची संधी दिली. यात सांगण्यात आले आहे की, 2018 मध्ये पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले. या दरम्यान दहशतवादी संघटनांनी सामान्य नागरिक, पत्रकार, स्थानिक नेते, सुरक्षा दल, पोलिस आणि शाळांना टार्गेट केले.